BJP X INC Goa: काँग्रेस विद्यार्थी संघटनेने दामू नाईकांसाठी बुक केली मानसोपचारतज्ज्ञांची अपॉइंटमेंट

Goa Politics News: काँग्रेसने गेल्या ६० वर्षापासून जे पेरलं आहे त्याची फळं आता समोर यायला लागलीयेत, असा आरोप दामू नाईक यांनी केला आहे.
Goa Politics | News Update
BJP Goa President Damu NaikDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांचे खापर काँग्रेसवर फोडल्यानंतर, काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासाठी थेट मानसोपचारतज्ज्ञांची अपॉइंटमेंटच बुक केलीय. बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा सरकारच्या अपयाशाचे आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला एनएसयुआयने दिला आहे.

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरुन दामू नाईक यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. काँग्रेसने गेल्या ६० वर्षापासून जे पेरलं आहे त्याची फळं आता समोर यायला लागलीयेत, असा आरोप नाईक यांनी केला आहे. याला काँग्रेसने देखील जोरदार प्रतित्युत्तर दिले आहे. दामूंच्या या वक्तव्यावर हसावं की रडावं अशी परिस्थिती झालीय, अशी प्रतिक्रिया काँग्रेस माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकरांनी दिली आहे.

Goa Politics | News Update
मटका म्हणजे काय? पुराव्यांअभावी मडगाव कोर्टाकडून संशयिताची निर्दोष सुटका

“गेल्या १२ वर्षांपासून राज्यात भाजपचं राज्य असून गृहखातं थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या ताब्यात आहे. तरीदेखील भाजप नेते आजही काँग्रेसला दोष देत आहे. ही जनतेची दिशाभूल करण्याची लाजिरवाणी बाब आहे,” असं पणजीकर म्हणाले.

१२ वर्षं सत्तेत राहूनही गुन्हे थांबवता येत नसतील तर भाजपने सत्तेतून पायउतार व्हावे, अशी मागणीही पणजीकरांनी केली

Goa Politics | News Update
Goa Crime: 3 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, पत्नीला जीवे मारण्याची धमकी; अमेरिकेतील व्यक्तीवर गुन्हा नोंद

काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने देखील याप्रकरणात उडी घेत दामूंसाठी थेट मानसोपचारतज्ज्ञांची अपॉइंटमेंटच बुक केलीय. आज दुपारी बारा वाजता दामूंना ऑनलाईन पद्धतीने घरुनच ही अपॉइंटमेंटला हजर राहता येईल, असे NSUI ने म्हटलं आहे. बिनबुडाचे आरोप करणाऱ्या दामूंना सत्य परिस्थिचा सामना करता येईल, असे NSUI नं म्हटलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com