Goa Politics: भाजपकडून गोमंतकीयांवरच अन्याय

Goa Politics: एल्विस गोम्स: ‘त्या’ पथकांची चौकशी करा
Elvis Gomes
Elvis Gomes Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: भाजपा सरकार गोमंतकीयांनाच लक्ष्य करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी केला. नुकताच, सुकूरमधील गजानन च्यारी यांचे घर कथित बेकायदा असल्याचा ठपका ठेवत पंचायतीने ते पाडण्याचे आदेश दिला आणि प्रशासकीय यंत्रणाही हे घर जमीनदोस्त करण्यासाठी त्या ठिकाणी पोचली.

Elvis Gomes
Goa News: ‘सेक्‍सवर्कर’ हा शब्द सुप्रीम कोर्टाच्या पुस्‍तिकेतून वगळला

त्यामुळे घर ‘डेमोलिशन’ करण्यासाठी गेलेल्या त्या पथकाची चौकशी करण्याची मागणी गोम्स यांनी केली आहे. शुक्रवारी (ता.१०) म्हापशातील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उत्तर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर व इतर उपस्थित होते.

गोम्स म्हणाले, गजानन च्यारी यांचे घर पाडण्याची नोटीस साबांखाला पोचली. सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांना ‘डेमोलिशन’ आदेशाची नोटीस पोहचते. त्यावेळी साबांखाने इतक्या घाईत आपल्या विभागाकडून नियोजन होऊ शकत नसल्याने अतिरिक्त वेळ मागितला होता. ही माहिती आरटीआयमधून उपलब्ध झाली आहे.

त्यामुळे प्रश्न असा पडतो, अंमलबजावणीसाठी ‘डेमोलिशन’ पथकात कुठल्या खासगी एजन्सीला सोबत नेण्यात आले होते? असा प्रश्न करीत त्या पथकाची चौकशी होण्याची आवश्यकता असल्याचे गोम्स म्हणाले.

एकीकडे, हरमल यासारख्या भागांत असंख्य व्यावसायिक बेकायदा बांधकामे उभी राहतात. परंतु, प्रशासकीय यंत्रणा तिथे कारवाई करीत नाही. त्यामुळे न्यायालयास हस्तक्षेप करून याची नोंद घ्यावी लागते. परंतु, सरकार च्यारी यांच्या सारख्या निवडक गोमंतकीयांना लक्ष्य करते. याउलट बिल्डर लॉबी किंवा बाहेरील व्यक्तींना मोकळीक मिळते, असा आरोप गोम्स यांनी केला. तसेच, कायदा हा सर्वांना एकसमान हवा, अशी मागणी त्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com