Goa Accident: कामाला जाताना काळाने गाठले, पाडी येथे बसच्या धडकेत दोन युवक ठार

Goa Fatal Accident: अपघातात दिलीप याला घटनास्थळीच मरण आले तर संदेश याला इस्पितळात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Fatal accident in Goa while going to work
Bus crushes two in Goa’s Padi villageDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: राज्यात अपघातांचे सत्र सुरूच असून दुचाकीवरून कामाला जात असताना पाडी (बार्से) येथे वळणावर एका वोल्वो बसने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवक ठार झाले. दिलीप वेळीप (३८) व संदेश गावकर (२६) अशी मृत युवकांची नावे असून ते दोघेही गोकुल्डे-बासें या एकाच गावातील रहिवासी आहेत.

बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान अपघाताची वरील दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदेश हा दुचाकी चालवीत होता व दिलीप मागे बसला होता. बस मडगावहून बंगळुरूला जात होती.

अपघातात दिलीप याला घटनास्थळीच मरण आले तर संदेश याला इस्पितळात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य सावंत पुढील तपास करीत आहे.

Fatal accident in Goa while going to work
Goa AAP: 'गोवा पोलिसांवर मंत्र्यांचा दबाव, कायदा आणि सुव्यवस्था ढासळली'; आप नेत्यांचा आरोप

बसचालकाला यल्लापूर येथून अटक

अपघाताच्या घटनेनंतर बस चालकाने घटना स्थळावरून बससह पळ काढला. नंतर त्याला कर्नाटकातील यल्लापूर येथे ताब्यात घेण्यात आले. राजेश शिवोळी (५५) असे या बस चालकाचे नाव असून, गुन्हा नोंद करून कुंकळ्ळी पोलिसांनी त्याला अटक केली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com