Goa Congress : कर्नाटकातील यशामुळे काँग्रेसच्या पालिकेतील अपयशावर मलमपट्टी

बऱ्याच प्रभागांत उमेदवार न मिळाल्याने नामुष्की
Congress Leader
Congress LeaderGomantak Digital Team

Congress In Ponda : बऱ्याच प्रभागांत काँग्रेसला उमेदवार मिळले नाहीत. प्रभाग 11 व 12 मधील उमेदवार हेही काँग्रेसचे सदस्य नव्हते. तरीही पक्षाला तडजोड करावी लागली. आणि त्याची परिणिती अपयशात झाली. असा सगळीकडे अंधार दिसत असताना नुकत्याच जाहीर झालेल्या कर्नाटक निवडणुकीतील निकालामुळे फोंड्यातील काँग्रेसजनांना आशेचा किरण दिसायला लागला आहे.

सध्या फोंड्यात काँग्रेसला भाजपबरोबर मगो प्रणित रायझिंग फोंडाशीही तोंड द्यावे लागत आहे. आता कर्नाटकातील यशामुळे उभारी आलेला फोंड्यातील काँग्रेस या त्रिकोणातून कशी वाट काढतो याचे उत्तर येणारा काळच देणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या साखळी व फोंडा पालिका निवडणुकीत काँग्रेसची अक्षरशः दुर्दशा झाली. साखळीत तर पानिपतच झाले. हातात असलेली पालिका निसटली. निवडणूक झालेल्या दहाही जागांवर अपयशाचे तोंड पाहावे लागले. फोंड्यातही वेगळी परिस्थिती नव्हती. फरक एवढाच होता की साखळी पालिकेवर काँग्रेसचे राज्य होते तर फोंडा पालिका भाजपच्याच हातात होती.

Congress Leader
Cannes Film Festival 2023: ‘कान्स’ मध्ये 54 व्या ‘इफ्फी’चे पोस्टर होणार प्रदर्शित

फोंड्यात काँग्रेसने नक्की किती जागा लढवल्या याची माहिती नसली तरी तीन प्रभागांवर काँग्रेसने लक्ष केंद्रित केले होते एवढे निश्चित. पण प्रभाग 6, 11 व 12 मध्येही काँग्रेस पॅनलचे उमेदवार अपयशीच ठरले. या तीन प्रभागांत काँग्रेसला एकूण 810 मते मिळाली. त्यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे 11 व 12 प्रभागांत काँग्रेसने भाजप पॅनलच्या उमेदवारांना ओव्हरटेक केले. पण प्रभाग 6 मधील काँग्रेसचे फोंड्याचे गटाध्यक्ष विलियम आगियार यांच्या पत्नी लिविया यांचा दारुण पराभव काँग्रेसला धक्कादायक असाच होता.

Congress Leader
Ada Sharma Accident : हिंदू एकता यात्रेला जात असताना अदा शर्मा आणि सुदीप्तो सेन यांचा अपघात!

त्यात परत काही प्रभागांत खासकरून प्रभाग 10 मध्ये काँग्रेसने भाजपशी सेटिंग केल्याचा जाहीर आरोप होत आहे. एकीकडे फोंड्यात भाजपचा आमदार तथा मंत्री असल्यामुळे काँग्रेसला सत्तेपुढे लढावे लागत आहे. दुसरीकडे रायझिंग फोंडाचे 4 नगरसेवक जिंकल्यामुळे विरोधक कोण, हाही प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे.

Congress Leader
Siddharth -Kiara Viral Photo : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ जपानमध्ये घेतायत सुट्टीचा आनंद...फोटो व्हायरल...

संधीचा फायदा कसा घेणार?

काँग्रेसला कर्नाटकात मिळालेल्या जबरदस्त यशामुळे गोव्यात व खासकरून फोंड्यात समीकरणे बदलू शकतात, असा राजकीय तज्ज्ञांचा होरा आहे. पण संधीचा फायदा घेणे हीसुद्धा एक कला असते. आता कर्नाटकात मिळालेल्या यशामुळे निर्माण झालेल्या संधीचा राजेश वेरेकर व त्यांचे सहकारी किती फायदा घेतात याचे उत्तर येणाऱ्या काळात दडले आहे एवढे खरे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com