Siddharth-Kiara Viral Photo: कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ जपानमध्ये घेतायत सुट्टीचा आनंद...फोटो व्हायरल...

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लग्नानंतरचे सहजीवन जपानमध्ये अनुभवत आहेत.
Siddharth-Kiara Viral Photo
Siddharth-Kiara Viral PhotoDainik Gomantak

Siddharth-Kiara Viral Photo: नवविवाहित जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवण्यासाठी त्यांच्या कामातून थोडा वेळ काढला आहे आणि दोघांनी त्यासाठी जपान निवडले आहे.

सध्या दोघांचे जपानमधले काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झालेले आपण पाहु शकतो.

पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे दोघे सध्या जपानमध्ये आहे आणि हे स्पेशल फोटो क्योटोमध्ये काढण्यात आले आहे, फोटोमध्ये सिद्धार्थ आणि कियाराने आरामदायक आणि कॅज्युअल ट्रॅकसूट घातलेले दिसू शकतात. दोघांनी जपानमध्ये भरपूर शॉपींग केल्याचंंही दिसू शकतं

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा झाली होती, दोघांच्या फॅन्सना आपल्या स्टार्सबद्दल मोठीच उत्सुकता दिसुन येत आहे.

सिद्धार्थ आणि कियाराने आपल्या नात्याबद्दल सुरूवातीला बरीचशी गोपनियता ठेवलेली होती, पापाराजीचा एक मोठा गट दोघांना स्पॉट करण्यासाठी चांगलाच धडपडत होता आणि दोघांनीही एके दिवशी लग्नाची बातमी दिलीच.

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या भव्य लग्नासाठी सूर्यगढ पॅलेस वधूप्रमाणे सजला होता. काही दिवसांपासून लग्नाची तयारी जोरात सुरू होती. संगीत आणि हळदी समारंभ 6 फेब्रुवारीला झाला. आणि 7 फेब्रुवारीला पार पडला. या नव्या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडचे मोठे मोठे सेलिब्रिटी उपस्थित होते

या पोस्टवर प्रतिक्रिया देत अनेक चाहत्यांनी या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव केला. "किती गोंडस," एका सोशल मीडिया युजरने कमेंट केली. तर दुसऱ्याने "त्यांच्यावर प्रेम करा," अशी कमेंट केली आहे .

रविवारी, दोघांनी त्यांच्या आईला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. लग्नाआधीच्या एका फंक्शनमधून तिच्या आईसोबतचा स्वतःचा फोटो शेअर करताना कियारा अडवाणीने लिहिले, "माझे सर्व काही (यलो हार्ट इमोजी)...." फोटोमध्ये, क्रीम लेहेंगा आणि पिवळा दुपट्टा घातलेल्या कियाराने आपल्या आईला मिठी मारत आणि कॅमेराकडे पाहताना पोझ दिली आहे .

Siddharth-Kiara Viral Photo
Ada Sharma Accident : हिंदू एकता यात्रेला जात असताना अदा शर्मा आणि सुदीप्तो सेन यांचा अपघात!
Sidhartha Malhotra
Sidhartha MalhotraDainik Gomantak

कियाराने एका सणातील तिच्या सासूसोबतचा स्वतःचा एक फोटोही शेअर केला आणि लिहिले, "तिच्यासाठी आभारी आहे." कियाराने सिद्धार्थ मल्होत्राचा तिची आई आणि आपल्या आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांने लिहिले, ‘हॅपी मदर्स डे’. आज आणि दररोज.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com