Goa Politics: फॉरवर्डला वगळून ‘आरजी’सोबत हातमिळवणी? काँग्रेसच्या गोटात नव्या आघाडीची चर्चा; खर्गेंशी चर्चा, गोव्यात नवी रणनीती

Goa Congress RGP alliance: गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने गोवा फॉरवर्डला तीन जागा सोडल्‍या होत्‍या. परंतु, विजय सरदेसाईंच्‍या रुपाने त्‍यांना केवळ फातोर्डाच जिंकता आले होते.
Goa Congress RGP alliance
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

सिद्धार्थ कांबळे

पणजी: येत्‍या विधानसभा निवडणुकीतील आघाडीसंदर्भात काँग्रेससोबतच्‍या युतीची चर्चा गोवा फॉरवर्डने स्‍थगित ठेवलेली असतानाच, आता गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षाला (आप) बाजूला ठेवून केवळ रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षासोबत (आरजीपी) आघाडी करण्‍याचा विचार काँग्रेसने चालवला आहे.

काँग्रेस अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी बेताळभाटी येथे घेतलेल्‍या काँग्रेसच्‍या राजकीय कामकाज समितीच्‍या (पीएससी) बैठकीत भाजपला पराभूत करण्‍यासाठी समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्‍यावर चर्चा झाली. त्‍यानंतर विधानसभा निवडणुकीत इतर पक्षांसोबतच्‍या आघाडीचा निर्णय स्‍थानिक नेतृत्‍व घेईल, असे खर्गे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Goa Congress RGP alliance
Goa Police: 'एफआयआर'साठीही कोर्टाची पायरी? गोवा खंडपीठाचा पोलिसांना संतप्त सवाल; पोलिस कारभारावर ओढले ताशेरे

परंतु काही वरिष्‍ठ नेत्‍यांनी खर्गे यांची खासगीत भेट घेऊन गोवा फॉरवर्ड व ‘आप’ला बाहेर ठेवून केवळ ‘आरजीपी’शीच आघाडी करण्‍याची विनंती केल्‍याचे काँग्रेसमधील सूत्रांनी ‘गोमन्‍तक’ला सांगितले. गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने गोवा फॉरवर्डला तीन जागा सोडल्‍या होत्‍या. परंतु, विजय सरदेसाईंच्‍या रुपाने त्‍यांना केवळ फातोर्डाच जिंकता आले होते. याउलट आरजीपीमुळे काँग्रेसच्‍या सात ते आठ उमेदवारांचा पराभव झालेला होता. दुसरीकडे, गेल्‍या पाच वर्षांत झालेल्‍या स्‍थानिक निवडणुकांत ‘आप’नेही खास कामगिरी केलेली नाही.

‘आप’ची मदार ख्रिस्‍ती मतदारांवर असली, तरी ख्रिस्‍ती मतदारांना ‘आप’पेक्षा काँग्रेस जवळचा पक्ष वाटत असल्‍याने गोवा फॉरवर्ड आणि ‘आप’ला बाजूला ठेवून आरजीपीला सोबत घेणे काँग्रेसला कसे फायदेशीर होऊ शकते, याची माहितीही वरिष्‍ठांनी खर्गे यांना दिल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

Goa Congress RGP alliance
Goa Accident Video: घरी परतताना काळाचा घाला! अज्ञात वाहनाच्या धडकेत मयडेतील सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

विजय, केजरींवर नाही विश्‍‍वास

१) ‘‘भाजपला पराभूत करण्‍याची मानसिकता असलेल्‍या पक्षांशीच निवडणुकीत आघाडी करण्‍याचा निर्णय काँग्रेसश्रेष्‍ठींनी घेतलेला आहे. अशा स्‍थितीत स्‍थानिक काही नेत्‍यांना आमदार विजय सरदेसाईंवर विश्‍‍वास नाही. भाजपला गरज पडेल, तेव्‍हा ते भाजपसोबत जाऊ शकतात, असा पक्‍का विश्‍‍वास त्‍यांना आहे. शिवाय तसा त्‍यांचा इतिहासही आहे.

२) ‘आप’चे राष्‍ट्रीय संयोजक अरविंद केजरीवालही भाजपसाठीच काम करीत असल्‍याचेही काहींना मनोमन वाटते. त्‍यामुळे या दोन पक्षांपेक्षा ‘आरजीपी’ला सोबत घेतल्‍यास २०२७ मध्‍ये राज्‍यात काँग्रेस आघाडी सरकार स्‍थापन होऊ शकते, अशी खात्री खर्गेंना दिली असून, पुढील काहीच महिन्‍यांत गोव्‍यात येणार असलेल्‍या राहुल गांधींकडेही हे नेते तशीच मागणी करणार आहेत, असेही सूत्रांनी नमूद केले.

आघाडीचा निर्णय स्‍थानिक नेतृत्‍व घेईल : खर्गे

पाटकर-गिरीश मतभेद पुन्‍हा उघड

पाटकर यांना या बैठकीचे आमंत्रण नव्‍हते का असे विचारले असता, प्रदेशाध्‍यक्ष चोडणकर यांनी, पाटकर यांना प्रदेश समितीचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष एम. के. शेख यांनी बैठकीची माहिती देण्‍यासाठी फोन केला होता आणि त्‍यांना एसएमएसही पाठविण्‍यात आला होता. या सर्वांचे पुरावे आमच्‍याकडे उपलब्‍ध आहेत. जर आपल्‍याला या बैठकीचे आमंत्रण मिळाले नाही, असे पाटकर म्‍हणत असतील तर ते खोटे बोलतात असे सांगितले.

Goa Congress RGP alliance
Goa Film City Project: जागेअभावी फिल्म सिटीचे स्वप्न लांबणीवर; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

पाटकरांनी दावा फेटाळला

प्रदेश काँग्रेसच्‍या राजकीय कामकाज कमिटीच्‍या (पीएसी) बैठकीला उपस्थित न राहिल्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांनी केलेले आरोप माजी प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी फेटाळून लावले. आपल्याला एम. के. शेख यांच्याकडून कोणताही संदेश मिळाला नव्हता. व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये केवळ एकच ‘टिक’ दिसत आहे. यावरून त्‍यांनी जो संदेश आपल्‍या फोनवर पाठवला तो आपल्‍यापर्यंत पोहोचला नसल्याचे स्पष्ट होते, असे पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com