Michael Lobo: काँग्रेसनेही गुन्हेगारांना आश्रय आणि तिकीट देण्यास सुरुवात केली?

टीएमसीची कॉंग्रेस आणि मायकल लोबोंवर टीका
Michael Lobo
Michael LoboDainik Gomantak
Published on
Updated on

Michael Lobo: माजी मंत्री मायकल लोबो यांच्या पक्षांतराच्या चर्चा गोव्याच्या राजकारणात चांगल्याच गाजल्या होत्या. अनेक विधानांनंतर आणि शक्यतांनंतर अखेरीस लोबो पती-पत्नींनी भाजपला रामराम केला आणि कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. मात्र एवढ्यावरच सगळे थांबले नाही. लोबोंना (Michael Lobo) कॉंग्रेसने प्रवेश स्वीकारल्यामुळे आधीचे कॉंग्रेसवासी नाराज झाले आणि कॉंग्रेसमधल्या लोकांचे राजीनामा सत्र सुरू झाले. यादरम्यान मायकल लोबोंवर अनेक आरोप-प्रत्यारोपाच्या मालिका सुरूच होत्या. लोबोंनी गोव्यातील भंडारी समाजाला संपवण्याची सुपारी दिली असल्याचा आरोप टीएमसी नेते किरण कांदोळकर (Kiran kandolkar) यांनी केला होता.

Michael Lobo
AAP: वाळपईत 'आप'चे बळ; संतोष गावकरांचा समर्थकांसह आपमध्ये प्रवेश

या एकंदरीत परिस्थितीमुळे लोबोंना ही निवडणूक जड जाईल का किंवा त्यांच्या मतांवर याचा परिणाम होईल का? अशी शंका वर्तवली जात होती. गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections 2022) जाहीर झाल्यापासून गोव्यातील सर्वच पक्ष आणि राजकीय नेते सक्रिय झाले आहेत. यादरम्यान आपला पक्ष कसा सर्वश्रेष्ठ आणि समोरचा पक्ष कसा निकामी, अशी स्पर्धाच जणू पक्षांमध्ये रंगली आहे. मागील काही दिवसात अनेक नेत्यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये (Trinamool Congres goa) प्रवेश केला आहे. त्यामुळे नक्कीच तृणमूल कॉंग्रेसची ताकद वाढली आहे. यातच त्यांनी मायकल लोबोंवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे.

Michael Lobo
गतवर्षी गोव्यातील रस्ता अपघातांच्या प्रमाणात सुमारे 20 टक्के वाढ

तृणमूल कॉंग्रेसने आपल्या AITC या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक खास व्हिडिओ शेअर करत मायकल लोबो हे गुन्हेगार असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये लोबोंवर आरोप करणारी जनता आणि काही राजकीय पुढारी दिसत आहेत. लोबोंच्या काही गुन्ह्यांबद्दल (Crime) उघडपणे बोलले आणि द्वेष व्यक्त केला जात आहे. 'मायकल लोबो हे त्यांच्या भ्रष्ट कारवायांसाठी ओळखले जातात आणि तरीही ते कळंगुटमधून काँग्रेसचे (Congress) उमेदवार आहेत. भाजपप्रमाणेच (BJP) काँग्रेसनेही गुन्हेगारांना आश्रय आणि तिकिटे देण्यास सुरुवात केली आहे?' अशी लोबोंवर टीका करत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. त्याचबरोबर गोव्यातल्या जनतेने त्यांना पुन्हा आपल्याला मूर्ख बनवू देऊ नका, असे आवाहनही केले आहे. निवडणूक तोंडावर असताना समोरील पक्षाने केलेल्या अशा आरोपांना मायकल लोबो आणि कॉंग्रेस कशाप्रकारे उत्तर देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com