गतवर्षी गोव्यातील रस्ता अपघातांच्या प्रमाणात सुमारे 20 टक्के वाढ

गोव्यात 2021 मध्ये एकूण 2844 अपघात झाले.
Accident
Accident Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेल्यावर्षी राज्यातील रस्ता अपघातांच्या प्रमाणात सुमारे 20 टक्के वाढ झाली आहे. अपघातात मृत्यूची संख्या 226 नोंद झाली आहे. हे प्रमाण 2020 च्या तुलनेत अधिक आहे. दुचाकीस्वारांचे मृत्यूचे प्रमाण मात्र 10 टक्क्यांनी कमी झाले आहे. 2021 मध्ये एकूण 2844 अपघात (Accident) झाले त्यातील सर्वाधिक अपघात फोंडा (300) व वेर्णा (221) या क्षेत्रात घडल्याची नोंद आहे.

Accident
AAP: वाळपईत 'आप'चे बळ; संतोष गावकरांचा समर्थकांसह आपमध्ये प्रवेश

यासंदर्भात माहिती देताना वाहतूक पोलिस (Traffic Police) अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी सांगितले की, 2020 मध्ये 2375 अपघातांची नोंद झाली होती त्याच्या तुलनेत झाले तर किरकोळ अपघात 421 झाले आहेत. मृत्यू झालेल्यांची संख्या 2020 मध्ये 223 होती तर 2021 मध्ये ती 226 वर गेली आहे. हे वाढीव प्रमाण 1.35 टक्के आहे.

Accident
दिगंबर कामतांमुळेच मडगावचा विकास खुंटला: बाबू आजगावकर

सासष्टी येथे मागील वर्षी 21 जीवघेणे अपघात आणि 51 किरकोळ अपघात झाले होते. तालुक्यातील पोलीस (Police) ठाण्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सासष्टी येथे रस्त्यांचे विस्तारीकरण, पार्किंग या बाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतेही नियोजन नसल्याचे दिसून येते. 2020 मधील पहिल्या 7 महिन्यात सासष्टी येथे झालेल्या आपघातांमद्धे 20 लोकांनी जीव गमावला, तर 17 किरकोळ अपघातात लोक जखमी झाले. आपघातांचे हे वाढते प्रमाण तालुक्यातील नागरिकांसाठी चिंतेचे कारण बनले आहे. मागील वर्षी झालेल्या आपघातांमद्धे फातोर्डा पोलिसांनी सर्वाधिक सहा मृत्यूची नोंद केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com