Goa Congress: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा म्हणजे मोठा भ्रष्टाचारच : काँग्रेसचा आरोप

Goa Congress: गोव्यात सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते कॅ. व्हिरियातो फर्नांडिस यांनी केला आहे.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

Goa Congress: गोव्यात सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते कॅ. व्हिरियातो फर्नांडिस यांनी केला आहे. राज्यातील ही क्रीडा स्पर्धा म्हणजे खेळापेक्षा व्यक्ती श्रेष्ठ असल्याचे दाखविण्याचा भाजप सरकारकडून प्रयत्न होत आहे.

Goa Congress
Goa Politics: कोणाला डावलण्याचा प्रश्‍‍नच नाही सदानंद शेट तानावडे यांचे स्पष्टीकरण

क्रीडा स्पर्धेसाठी बनविलेल्या होर्डिंग्जवर नेत्यांचे फोटो मोठे व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही अक्षरे अगदी लहान आहेत, त्यातून भाजप नेत्यांचा प्रसिद्धीसाठी असलेला प्रयत्न दिसून येतो, असे व्हिरियातो यांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फलक तयार करण्यासाठी व जाहिरातींसाठी १८ कोटी रुपयांचा खर्च सरकारने केला आहे. ते काम इतर राज्यातील कंत्राटदाराला दिले आहे.

Goa Congress
Goa Accident Case: होंड्यातील अपघातात वेळगेचा युवक ठार

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जे फलक बनविले आहेत, त्यात काही ठिकाणी असलेल्या फलकांवर स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंची संख्या ८ हजार, तर काही फलकांवर खेळाडूंची संख्या १० हजार लिहिली आहे. यातून जो दोन हजार खेळाडूंचा फरक दाखविला आहे, त्यातून सरकारला नेमके काय सांगायचे आहे, असा सवाल व्हिरियातो यांनी केला आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोन हजार खेळाडूंच्या नावाने खर्च दाखविला जाण्याचा सरकारचा प्रयत्न आहे काय? अशा प्रकारांमुळे खेळाची प्रतिमा मलीन होणार आहे. काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही. राज्य सरकारकडून या स्पर्धेच्या आयोजनातील प्रत्येक पैशाचा हिशोब मागणार आहे.

- कॅ. व्हिरियातो फर्नांडिस, काँग्रेसचे नेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com