Goa Accident Case: होंड्यातील अपघातात वेळगेचा युवक ठार

Goa Accident Case: ट्रकचालकास अटक: जखमीवर उपचार सुरू
Goa Accident Case
Goa Accident CaseDainik Gomantak

Goa Accident Case: होंडा औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या जंक्शनवर 28 रोजी सायंकाळी साडेचार वाजता अवजड वाहन व मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. त्यात वेळगे येथील दुचाकीचालक प्रज्वल दत्तप्रसाद धुरी (वय २२) ठार झाला, तर त्यांच्या सोबत असलेला साईल सुनील आमोणकर हा गंभीर जखमी झाला.

Goa Accident Case
Goa Politics: कोणाला डावलण्याचा प्रश्‍‍नच नाही सदानंद शेट तानावडे यांचे स्पष्टीकरण

जखमीवर गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचार सुरू केले आहेत. पोलिसांनी तातडीने दखल घेऊन वाहनचालक जनार्दन गौडा याला अटक केले.

प्रज्वल हा युवक आपला मित्र सुनील आमोणकर याला घेऊन होंड्याच्या दिशेने येऊन वाळपईकडे जात होता, तर वर नमूद केलेला ट्रक होंडा औद्योगिक वसाहतीमधील कंपनीचा माल घेऊन औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावरुन वाळपई होंडा रस्त्यावर येत असताना अवजड वाहन चालकाने कोणतीही खबरदारी न घेतली नाही.

हॉर्नही वाचवला नाही. त्यामुळे हा अपघात घडला. दुचाकी चालक प्रज्वल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना साखळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. पण तेथे दाखल करताना प्रज्वलचे निधन झाले, अशी माहिती होंडा पोलिसांनी दिली आहे.

वाहतुकीवर नियंत्रण हवे!

प्रिया नाटेकर म्हणाल्या, अपघातात कारणीभूत ठरलेले अवजड वाहन औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांवरून भरधाव वेगाने प्रमुख रस्त्यांवर घेण्यात आले. त्यावेळी दुचाकीच्या मागे बसलेल्याने आरडाओरडा करून सुद्धा त्या वाहनांच्या चालकांनी कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्यामुळे औद्योगिक प्रशासनाने दखल घेऊन या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी गतिरोधक किंवा गार्ड, पोलिस तैनात करण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com