Goa Politics: कोणाला डावलण्याचा प्रश्‍‍नच नाही सदानंद शेट तानावडे यांचे स्पष्टीकरण

Goa Politics: सदानंद शेट तानावडे : श्रीपाद नाईक प्रकरणी सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
Sadanand Shet Tanawade
Sadanand Shet TanawadeDainik Gomantak

Goa Politics: केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटनावेळी स्वयंपूर्ण रथावर स्थान न दिल्याच्या ‘गोमन्तक’च्या वृत्ताची दखल सार्वत्रिकपणे घेण्यात आली आहे. ही बातमी भाषांतरित करून भाजपच्या दिल्लीतील नेत्यांपर्यंत पोहोचविण्याची दक्षताही सत्ताधारी गोटातून घेण्यात आली आहे.

Sadanand Shet Tanawade
Goa National Games 2023: राज्यावर नव्या करांची शक्यता; राज्य आर्थिक संकटात

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे यांनी या प्रतिनिधीशी संपर्क साधून भाजपमध्ये सर्व काही आलबेल आहे, कोणालाच डावलण्याचा प्रश्नच येत नाही अशी सारवासारव केली आहे.

श्रीपाद नाईक यांना डावलले गेल्याची सार्वत्रिक भावना समाजमाध्यमावर उमटत आहे. अनेकांनी ‘गोमन्तक’चे वृत्त फेसबुक, इन्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून सार्वत्रिक केले आहे. भंडारी समाजाच्या सरचिटणीसपदी निवडून येऊनही

पदाचा ताबा न स्वीकारलेले उपेंद्र गावकर यांनी सांगितले, भंडारी समाज भाजपच्या मागे उभा राहिल्याचा इतिहास आहे. आजही भाजपमध्ये भंडारी समाजाचे आमदार, नेते आहेत. नाईक यांना डावलले गेल्याचा विषय जेवढा समाजाचा आहे तेवढाच तो भाजपचा अंतर्गतही आहे.

भंडारी समाजाचे युवा नेते सुनील सांतिनेजकर यांनी या प्रकरणी श्रीपाद नाईक यांनाच दोष दिलाय. नाईक यांनी योग्यवेळी तोंड उघडले असते तर ते आज मुख्यमंत्रीपदी असते याची आठवण त्यांनी करून दिली. ते म्हणाले, भंडारी नेत्याला डावलले गेले यात शंका नाही. नाईक आता मूग गिळून गप्प बसले तर त्यांची राजकीय संधी हिरावून घेतली गेली तर आश्चर्य वाटू नाही.

भंडारी समाज भाजपच्या मागे उभा राहिल्याचा इतिहास आहे. आजही भाजपमध्ये भंडारी समाजाचे आमदार, नेते आहेत. नाईक यांना डावलले गेल्याचा विषय जेवढा समाजाचा आहे तेवढाच तो भाजपचा अंतर्गतही आहे. त्यामुळे त्या नेत्यांनी आधी आपल्या भाजप पक्षाच्या स्थानिक नेत्याना जाब विचारायला हवा. - उपेंद्र गावकर, सरचिटणीस, भंडारी समाज

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com