Goa BJP: भाजप युवा मोर्चातर्फे साव्हियो कुतिन्होविरोधात तक्रार

Goa BJP: सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून भाजपचे नाव बदनाम केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे काँग्रेसचे नेते साव्हियो कुतिन्हो यांच्या विरुद्ध मडगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak
Published on
Updated on

Goa BJP: सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून भाजपचे नाव बदनाम केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे काँग्रेसचे नेते साव्हियो कुतिन्हो यांच्या विरुद्ध मडगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या विषयी मडगाव पोलिसांनी कुतिन्हो यांना आज दुपारी 12 वाजता पोलिस स्थानकात हजर राहण्यासाठी समन्स पाठविला.

Goa BJP
Goa News: पंचसदस्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

कोकण रेल्वे स्थानकावर गाड्यांना प्रवेश करण्यासाठी असलेल्या टोल नाक्यावर भाजपचे काही पदाधिकारी स्टेशन कंपाउंडमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाकडून ‘प्रवासी कर’ म्हणून २० रुपये वसूल करत आहेत, असे यावेळी कुतिन्हो यांनी १७ नोव्हेंबर रोजी या ठिकाणी केलेल्या आंदोलनावेळी सांगितले होते.

Goa BJP
Comunidade: हरवळे ‘कोमुनिदाद’मधील घरांना नोटीस, घरमालकांमध्ये खळबळ

त्यांनतर 21 नोव्हेंबर रोजी साव्हियो कुतिन्हो यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसमवेत मडगाव रेल्वे स्थानकाच्या टोल बूथजवळ पुन्हा आंदोलन केले होते. यावेळीही त्यांनी पैसे वसूल करण्यात भाजपच्या कार्यकर्त्याचा समावेश असल्याचे म्हटले होते. प्रकरणाचा मजकूर कुतिन्हो यांनी व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये व्हायरल केला होता. या प्रकरणी भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष अभिषेक काकोडकर यांनी पोलिस तक्र्रार दाखल केली आहे.

गैरप्रकाराबाबत तक्रार दाखल

कुतिन्हो याबाबत म्हणाले, मी पक्षाचे नाव कसे बदनाम केले, जे लोक तेथे गैरकृत्य करीत होते, त्याबाबत तक्रार केली. भाजपचे एक पदाधिकारी सत्यविजय नाईक हे कोकण रेल्वे स्टेशनवर बेकायदेशीरपणे टोल वसूल करत होते. ही बाब कोकण रेल्वेच्या निदर्शनास आणून दिली असून याबाबत मी पोलिसात तक्रार करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

rent a car driver attack case
Goa municipal administrator appointment
Margao Municipal Council Garbage Tender Scam
Canacona Molestation Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com