Comunidade: हरवळे ‘कोमुनिदाद’मधील घरांना नोटीस, घरमालकांमध्ये खळबळ

Comunidade: कोमुनिदाद जमिनीत बांधलेली घरे नियमित करण्याच्या सरकारच्या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करून आमची घरे वाचवावीत, अशी मागणी हरवळे कोमुनिदादच्या जागेत घरे बांधलेल्या काही नागरिकांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
Court
CourtDainik Gomantak

Comunidade: कोमुनिदाद जमिनीत बांधलेली घरे नियमित करण्याच्या सरकारच्या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करून आमची घरे वाचवावीत, अशी मागणी हरवळे कोमुनिदादच्या जागेत घरे बांधलेल्या काही नागरिकांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

Court
Goa Police: साक्षीदारांना शोधून काढणे पोलिसांसमोर मोठे आव्‍हान

हरवळे येथील कोमुनिदाद जमिनीत बांधलेल्या घरांवर कारवाई करण्याच्यादृष्टीने कोमुनिदाद प्रशासनाकडून नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. कोमुनिदाद प्रशासनाच्या या निर्णयामुळे हरवळे येथील स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.

या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.२२) सायंकाळी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी गुरुप्रसाद नाईक, नरेश आमोणकर, कृष्णनाथ मडकईकर, गजानन हळर्णकर, गौरव तळकर, अलीम खान, विनायक देसाई आदी घरमालक उपस्थित होते.

Court
IFFI 2023: 'इफ्फी'त आज, गुरूवारी काय पाहाल? जाणून घ्या आजचे चित्रपट, संवाद सत्रांविषयी...

हरवळे येथील कोमुनिदाद जमिनीत शंभरहून अधिकजणांनी घरे बांधली आहेत. बहुतेक घरे 25 वर्षांपूर्वीच बांधण्यात आली असून, यात 80 टक्क्यांहून अधिक घरे ही स्थानिक आणि नीज गोमंतकीयांची आहेत. कोमुनिदादकडून जागा घेऊनच आम्ही आमची घरकुले उभारली असून, जवळपास 70 टक्के सरकारी प्रक्रिया पूर्ण केली आहे.

घरे बांधताना कोणताही बेकायदेशीर व्यवहार केलेला नाही. असे असतानाही आमची घरे अजून नियमित झालेली नाहीत. असा दावा गुरुप्रसाद नाईक, नरेश आमोणकर आणि कृष्णनाथ मडकईकर या घरमालकांनी केला आहे.

सरकारचा निर्णय हिताचा!

कोमुनिदाद जमिनीतील घरे नियमित करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय योग्य आणि नीज गोमंतकियांच्या हिताचा आहे. मात्र काहीजण या निर्णयावरून राजकारण करीत आहेत, असे गुरुप्रसाद नाईक, नरेश आमोणकर आणि कृष्णनाथ मडकईकर यांनी म्हटले आहे.

कोमुनिदाद जमिनीतील घरे नियमित करण्याच्या सरकारच्या या निर्णयाचे हरवळेतील घरमालकांनी स्वागत करुन, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना धन्यवाद दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com