Goa News: पंचसदस्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Goa News: बांधकाम परवान्यासाठी कथित लाच प्रकरण
Extortion Case
Extortion CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: बांधकाम परवान्यासाठी कथित लाच घेतल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांत तक्रारीसोबत व्हिडिओ फुटेज देण्यात आले, तरी अर्जदाराविरुद्ध कोणताही गुन्हा नोंदविण्यात आलेला नसल्यामुळे अटक होण्याचे कोणतेही कारण असू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत अटकपूर्व जामिनासाठी साल्वादोर द मुंद पंचसदस्य कृष्णकांत चोडणकर यांनी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला.

Extortion Case
Comunidade: हरवळे ‘कोमुनिदाद’मधील घरांना नोटीस, घरमालकांमध्ये खळबळ

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 438 नुसार गुन्हा नोंद असलेल्या व्यक्तीला अटकेच्या भीतीमुळे जामिनासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा आहे, मात्र पर्वरी पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या उत्तरामध्ये अर्जदार कृष्णकांत चोडणकर यांच्याविरुद्ध एफआयआरच नोंद झाली नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे गुन्हाच नसल्याने अर्जदाराला अटकपूर्व जामीन देण्याचा प्रश्‍नच उद्‍भवत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने आदेशात केले आहे.

Extortion Case
Goa Police: साक्षीदारांना शोधून काढणे पोलिसांसमोर मोठे आव्‍हान

पर्वरी पोलिस स्थानकात अर्जदार चोडणकर यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली असल्याने अटक होण्याच्या भीतीने अर्ज त्यांनी केला होता. अटक झाल्यास पोलिसांना जामीन देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली होती. अर्जदार व इतर चार साल्वादोर पंचायत सदस्यांनी पंचायतीच्या उपसरपंचांविरुद्ध अविश्‍वास ठराव दाखल केला होता व तो ठराव मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. त्यांना खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याची धमकीही दिली होती, असे अर्जात नमूद करण्यात आले होते.

पर्वरी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीसोबत जोडण्यात आलेली व्हिडिओ फूटेज पाहण्यास चोडणकर यांनी अर्ज सादर करून हरकत घेतली होती. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार अशी फुटेज पाहण्यास न्यायालयाला कोणताही प्रतिबंध नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्यांचा तो अर्ज फेटाळला होता व अटकपूर्व जामिनावरील सुनावणी २१ नोव्हेंबरला ठेवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pradeep Yadav Bail Rejected
Liberian Drug Accused Goa
Girish Chodankar Congress Alliance
236 Grams Ganja Charas Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com