'LPG' स्वस्त; खर्चाचा ताण कायम! हॉटेल व्यावसायिकांचे मत, दर अजूनही पूर्वीपेक्षा खूप जास्तच

Commercial LPG Price Cut: हॉटेल व्यावसायिकांच्या मते, व्यावसायिक सिलिंडरचा दर अजूनही युद्धपूर्व पातळीपेक्षा खूप जास्त आहे
Commercial LPG Price Cut
Commercial LPG Price CutDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात १ जुलैपासून १८३.५० रुपयांची कपात करण्यात आली असली, तरी हॉटेल व रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या किमती तत्काळ कमी होण्याची शक्यता कमी असल्याचे काही हॉटेल व्यावसायिकांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही महिन्यांत पश्चिम आशियातील संघर्षामुळे ‘एलपीजी’चे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर ही कपात दिलासादायक असली, तरी ती अपुरी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. हॉटेल व्यावसायिकांच्या मते, व्यावसायिक सिलिंडरचा दर अजूनही युद्धपूर्व पातळीपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे केवळ एका कपातीमुळे खाद्यपदार्थांच्या दरात बदल करणे शक्य नाही. मजुरीचा खर्चही वाढलेला आहे.

Commercial LPG Price Cut
Gas Cylinder Booking New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; आता 'इतक्या' दिवसांनंतरच मिळेल दुसरा सिलिंडर, पाहा नवीन गाईडलाईन्स

पूर्वी १८०० रुपये असलेला एलपीजी सिलिंडर आखाती संघर्षानंतर ३७०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. आता दर कमी होऊनही सिलिंडरसाठी सुमारे ३०१४ रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा अजूनही दुप्पट खर्च होत असून, सिलिंडरचा दर पुन्हा १८०० रुपयांच्या आसपास आल्याशिवाय खाद्यपदार्थांचे दर कमी करणे शक्य नाही.

- दीपक पै, अध्यक्ष दक्षिण गोवा हॉटेल चालक संघटना

व्यावसायिक सिलिंडरचा दर अजूनही खूप जास्त आहे. त्यामुळे केवळ एका कपातीमुळे खाद्यपदार्थांच्या दरात बदल करणे शक्य नाही. याशिवाय खाद्यतेल, भाज्या, वीज, व मजुरीचा खर्चही वाढलेला असल्याने एकूण उत्पादन खर्चावर परिणाम होत आहे. - आराध्या तळावलीकर,

हॉटेल व्यावसायिक, म्हापसा

Commercial LPG Price Cut
LPG Gas Cylinder: 'गॅसमाफियांची आता खैर नाही'! छापेमारीची तयारी सुरू; काळाबाजार रोखण्‍यासाठी ‘मिशन’

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातील सततच्या चढ-उतारामुळे हॉटेल व केटरिंग व्यवसाय अडचणीत आला आहे. दरकपात दिलासादायक असली तरी भविष्यातील दरवाढीची भीती, सिलिंडरचा तुटवडा आणि वाढती महागाई यामुळे सरकारने स्थिर दराचे धोरण राबवावे, अशी मागणी आहे.

- सुमित्रा नाईक, वाळपई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com