Gas Cylinder Booking New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; आता 'इतक्या' दिवसांनंतरच मिळेल दुसरा सिलिंडर, पाहा नवीन गाईडलाईन्स

Gas Cylinder Booking Rule: पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि इंधन बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे.
Gas Cylinder Booking New Rule
Gas Cylinder Booking New RuleDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि इंधन बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत नवीन नियमावली (Rationalization) जाहीर केली आहे. घरगुती गॅसची काळाबाजारी रोखण्यासाठी आणि साठेबाजीला चाप लावण्यासाठी आता बुकिंगच्या कालावधीत बदल करण्यात आला आहे.

बुकिंगमधील अंतरात वाढ आणि नवीन नियम

पेट्रोलियम मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन नियमांनुसार, आता शहरांमधील ग्राहकांना एका सिलिंडरनंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी किमान २५ दिवस वाट पाहावी लागणार आहे (यापूर्वी हा कालावधी २१ दिवसांचा होता). ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हे अंतर आता ४५ दिवस करण्यात आले आहे. गॅस सिलिंडरची ऑनलाइन बुकिंग ९८ टक्क्यांपर्यंत नेण्याचे आणि ९४ टक्के डिलिव्हरी 'डीएसी' (Delivery Authentication Code) कोडवर आधारित करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

Gas Cylinder Booking New Rule
Goa PWD Scam: सार्वजनिक बांधकाम विभागात 1000 कोटींचा निविदा घोटाळा? बनावट कागदपत्रांच्या आधारे कंत्राट मिळवल्याचा आरोप

दर स्थिर, पण कमर्शियल गॅसचे चटके कायम

सामान्य जनतेसाठी दिलासादायक बाब म्हणजे १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांसाठी कमर्शियल सिलिंडरच्या किमती अजूनही ३,००० रुपयांच्या पार आहेत.

सध्या दिल्लीत घरगुती सिलिंडर ९१३ रुपये, तर पाटण्यात सर्वाधिक १,००२.५० रुपयांना मिळत आहे. ५ किलोच्या छोट्या सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली असून तो आता ८१०.५० रुपयांवर पोहोचला आहे.

पंतप्रधानांचे संयमाचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणामधील एका कार्यक्रमात देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केले आहे. परकीय चलन वाचवण्यासाठी केवळ गरज असेल तेव्हाच पेट्रोलियम उत्पादनांचा वापर करा, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सरकारने गॅस पुरवठ्यासाठी एक प्राधान्य यादी तयार केली असून, यामध्ये रुग्णालये, शाळा, औषध निर्मिती, स्टील आणि कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.

Gas Cylinder Booking New Rule
Goa CM Pramod Sawant: सोने खरेदीवर संयम ठेवा! लोकांनी पंतप्रधान मोदींचे आवाहन गांभीर्याने घ्यावे - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पर्यायी इंधनावर भर

सरकारने स्पष्ट केले आहे की देशात गॅसची कोणतीही कमतरता नाही, त्यामुळे नागरिकांनी 'पॅनिक बुकिंग' करू नये. सध्या बुकिंगनंतर सिलिंडर मिळण्यासाठी ३ ते ५ दिवसांचा कालावधी लागत आहे. सरकारने ग्राहकांना इंडक्शन कुकटॉप, पीएनजी (PNG) आणि सीएनजी (CNG) यांसारख्या पर्यायी इंधनांकडे वळण्याचे प्रोत्साहन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com