

पणजी: गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी नागरीपुरवठा खात्याने पोलिसांची मदत मागितली आहे. तसेच राज्यभर छापेमारीची तयारी सुरू केली आहे. तिन्ही जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना यासंदर्भात अधिकृत विनंती करण्यात आली आहे.
नागरीपुरवठा खात्याचे कर्मचारी गॅस डिलर आणि गोदामांवर तैनात असतानाही सिलिंडर वाहतूक करणाऱ्या वाहनांतील चालक व साहाय्यकांकडून काळाबाजार होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
व्यावसायिक वापरासाठी सुरुवातीला २० टक्के, त्यानंतर ४० टक्के आणि सध्या ६० टक्क्यांपर्यंत सिलिंडरचा पुरवठा वाढवण्यात आला आहे. मात्र, या वाढीचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणावर सिलिंडर काळ्याबाजारात वळवले जात असल्याने ग्राहकांना चढ्या दराने सिलिंडर खरेदी करावा लागतोय.
ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सिलिंडर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांच्या मदतीने छापेमारी करण्याची योजना आखण्यात आली आहे. आता लवकरच कारवाई सुरू करण्यात येईल.
नागरीपुरवठा खात्याच्या मागणीनुसार पोलिस कर्मचारी पुरवण्यात आले आहेत. गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी ते मदत करतील. तसेच सिलिंडर टंचाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यावरही लक्ष ठेवले जात आहे.
- हरिश्चंद्र मडकईकर, पोलिस अधीक्षक (उत्तर गोवा)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.