Goa Police: गोव्यातून एका पाकिस्तानी नागरिकाची हकालपट्टी; पोलिसांची तपासणी अधिक तीव्र

Pakistani national deported: विदेशी नागरिक नोंदणी कार्यालय गोवा यांनी राज्यात अवैधपणे वास्तव्य करत असलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाला हद्दपार केले
Pakistani national deported Goa
Pakistani national deported GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पहलगाम दहशदवादी हल्ल्यानंतर गोवा पोलिसांनी उत्तर आणि दक्षिण गोव्यात मोठी सुरक्षा मोहीम राबवून भाडेकरूंची तपासणी अधिक तीव्र केली आहे. या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी १२,८२८ पेक्षा जास्त भाडेकरू आणि कामगारांची पडताळणी केली. तसेच विदेशी नागरिक नोंदणी कार्यालय गोवा यांच्याकडून राज्यात अवैधपणे वास्तव्य करत असलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाला हद्दपार करण्यात आलेय.

गोवा पोलिसांकडून राज्याबाहेरील तसेच देशाबाहेरील कामगार तसेच नागरिकांवर ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत सुमारे १६०५ संशयित व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेण्यात आले आहे. राज्यात कुठल्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना थारा मिळू नये म्हणून सरकार ही मोहीम राबवत आहे.

गोवा पोलिसांनी २९ एप्रिल २०२५ रोजी उत्तर आणि दक्षिण गोव्यात मोठी सुरक्षा मोहीम राबवून तपासणी अधिक तीव्र केली आहे. जुन्या गोवा पोलिसांनी परिसरात मोठी शोध मोहीम आणि भाडेकरू पडताळणी केली.

Pakistani national deported Goa
Combing Operation: ..पोलिसांची कारवाई सुरूच! 3 पाकिस्तानी नागरिकांनी सोडला गोवा; 14517 जणांची पडताळणी, 108 जणांना अटक

या कारवाईत पोलिसांनी ४४१ लोकांची पडताळणी केली, २१ संशयितांना ताब्यात घेतले तर कलम ३५ अंतर्गत ७ जणांना अटक केली. याशिवाय ५ अनोळखी व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे १ आणि कायद्याचे उल्लंघन करणारे १० जण पोलिसांच्या हाती लागले.

गोवा पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे राज्यात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे. आगामी काळातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सुरू ठेवल्या जातील, जेणेकरून गुन्हेगारी आणि बेकायदेशीर कृत्यांवर नियंत्रण मिळवता येईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com