Combing Operation: ..पोलिसांची कारवाई सुरूच! 3 पाकिस्तानी नागरिकांनी सोडला गोवा; 14517 जणांची पडताळणी, 108 जणांना अटक

Goa Police Action: रात्रीच्या कारवाईवेळी ज्यांच्याकडे आवश्‍यक दस्तावेज नव्हते किंवा भाडेकरूंनी माहिती दिली नव्हती, त्यांना पोलिस स्थानकावर बोलावून त्यांची पडताळणी करण्यात आली.
Goa Police Action
Goa Police Combing OperationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: काश्‍मीरच्या पहलगाम भागात हल्लीच झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत केलेल्या व्यापक शोधमोहिमेत (कोंबिंग ऑपरेशन) १४,५१७ जणांची पडताळणी करण्यात आली. १०८ जणांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली, तर ३५२ संशयित सापडले आहेत. १३०६ जणांना पडताळणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. अल्पकालीन व्हिसावर गोव्यात वास्तव्यास असलेल्या तीन पाकिस्तानी नागरिकांनी गोवा सोडला आहे.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा उपाययोजना करण्याच्या पार्श्‍वभूमीवर गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्यात गेल्या शुक्रवारी (२५ एप्रिल) संध्याकाळी तातडीने मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांना राज्यात ३ अल्पकालीन व १७ दीर्घकालीन गोव्यात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या.

उत्तर गोव्यात ६७९६ जणांची पडताळणी

उत्तर गोवा पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत ९८९१ भाडेकरू व नोकर वर्गाची पडताळणी करताना आज दिवसभरात ६७९६ जणांची पडताळणी केली. ७८ जणांना प्रतिबंधात्मक अटक केली, तसेच बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या ३४ फेरवाल्यांविरोधात कारवाई करण्यात आली. ३४५ जणांना संशयास्पद म्हणून ताब्यात घेण्यात आले.

Goa Police Action
Goa Police: गोवा पोलिसांचे Combing Operation! 666 संशयित, 147 जणांवर गुन्हे; 2189 जणांची कागदपत्रे तपासली

दक्षिण गोव्यात २२ संशयित ताब्यात

दक्षिण गोवा पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत ४१९८ जणांची पडताळणी केली. त्यामध्ये ३१७८ भाडेकरू व नोकर वर्गाचा समावेश आहे. २२ जणांना संशयास्पद म्हणून, तर ५०३ जणांना पडताळणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. गेस्ट हाउस व हॉटेलमधील २०४ जणांची तपासणी करण्यात आली. ७६ जणांवर भाडेकरूंची माहिती न दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.

Goa Police Action
Combing Operation Goa: पहलगाम हल्ल्यानंतर गोव्यात 'कोम्बिंग ऑपरेशन'; 21 जणांना अटक Watch Video

कोम्‍बिंग ऑपरेशन

१ रस्त्यावर नाकाबंदी, स्थलांतरित कामगार व भाडेकरूंची तपासणी सुरू करण्याबरोबरच मुस्लीम नागरिक तसेच परप्रांतीय राहत असलेल्या वस्तींची पडताळणी सुरूच आहे.

२ रात्रीच्या कारवाईवेळी ज्यांच्याकडे आवश्‍यक दस्तावेज नव्हते किंवा भाडेकरूंनी माहिती दिली नव्हती, त्यांना पोलिस स्थानकावर बोलावून त्यांची पडताळणी करण्यात आली.

३ राज्यात सुरक्षेसाठी बंदोबस्त तसेच संशयास्पद आढळून येणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवली जाणार आहे. पोलिसांकडून अधूनमधून भाडेकरूंची पडताळणी मोहीम सुरूच राहणार आहे.

४ व्हिसा संपल्यानंतरही राज्यात वास्तव्य करून पाकिस्तानी नागरिक आढळून आल्यास त्यांना वास्तव्य देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com