राज्याला कौशल्य विकास संस्थांची गरज

डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते फोंडा येथे ‘एफएसएआय’च्या केंद्राचे उद्‌घाटन; मनुष्यबळाच्या विकासासाठी सरकार करणार प्रयत्न
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्याला विविध क्षेत्रांत कौशल्य विकास संस्थांची गरज आहे. अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संचालनालयाला केवळ पायाभूत सुविधाच नव्हे तर कौशल्य विकासातही सुधारणा करण्याचा सरकार विचार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

फायर अॅण्ड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाने (एफएसएआय) गोवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने फर्मागुढी-फोंडा येथे सुरू केलेल्या एफएसएआयच्या कौशल्य विकास केंद्राच्या (एफएसडीसी) उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.


आयआयटी, एनआयटी, जीआयएम, बीआयटीएस पिलानी आणि इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या मदतीने राज्याच्या मनुष्यबळाचा कुशल मनुष्यबळात विकास करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी समिती स्थापन केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी एफएसएआयला एफएसडीसीमार्फत राज्य सरकारच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अभ्यासक्रम सुरू करण्याचा सल्ला दिला. अग्निशामक आणि आपत्कालीन खात्यात या प्रकारचे सरकारमान्य अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचा विचार सरकार करणार आहे. त्यासाठी भविष्यात भरती नियमातही बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

CM Pramod Sawant
वेर्णा येथील टायटन जंक्शनवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

एफएसएआय, ओ आणि जी उद्योगचे अध्यक्ष मुकेश शाह यांनी एएएजी, शाह भोगीलाल जेठालाल आणि ब्रदर्स यांच्यावतीने एफएसएआयच्या कौशल्य विकास केंद्रासाठी देणगी म्हणून 5 लाखांचा धनादेश सुपूर्द केला. प्रा. डॉ. राजेश लोहानी आणि अजित राघवन यांनी सामंजस्य कराराची देवाणघेवाण केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एफएसएआय सुरक्षा निर्देशांक जर्नलचे प्रकाशन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com