CM Pramod Sawant: पोलिस दल पुनर्रचना दृष्टिपथात : मुख्‍यमंत्री

किनारी भागात निकोप पर्यटनासाठी कठोर पावले
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant Says Police Force Restructuring on the Horizon: किनारी भागातील गैरप्रकार रोखून पर्यटनाला नवा आयाम देण्‍यासाठी राज्‍य सरकार कठोर पावले उचलत आहे. त्‍यासाठी प्राधान्‍यक्रमाने पोलिस दलाची पुनर्रचना करण्‍याच्‍या निर्णयाप्रत मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पोहोचले आहेत.

हप्‍तेवसुली, गैरकृत्‍यांना चालना मिळण्‍याजोगे वर्तन असणाऱ्या वा तशा तक्रारी प्राप्‍त झालेल्‍या पोलिस कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू करण्‍यात आली आहे, अशीही माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्‍त झाली आहे.

उत्तर गोव्‍यात किनारी भागातील हॉटेल व्‍यावसायिकांकडून खंडणी मागितली जाते, असा आरोप विरोधी पक्षांकडून होऊ लागल्‍याने मुख्‍यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या तत्त्वानुसार राज्‍य सरकार पारदर्शक कारभारालाच प्राधान्‍य देते, असे त्‍यांनी यापूर्वीही स्‍पष्‍ट केले आहे.

पर्यटन सेवांशी संबंधित आरोपांमुळे व्‍यथित झालेल्‍या डॉ. सावंत यांनी उच्‍च पातळीवर शहानिशा सुरू केली असून, गैरकृत्‍ये कदापि खपवून घेतली जाणार नाहीत, अशी त्‍यांनी पोलिस दलातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांना तंबीच दिली आहे.

CM Pramod Sawant
Colva Beach Goa: कोलवा बीचवर बुडणाऱ्या 3 पर्यटक तरूणांचा वाचवला जीव; 'दृष्टी'च्या जीवरक्षकांची कामगिरी

विरोधकांच्‍या आरोपांनंतर कसून चौकशी सुरू

किनारी पर्यटनावर करडी नजर

  1. सरकारी अधिकाऱ्यांनी वरिष्‍ठ पातळीवरून केलेल्‍या पाहणीत पोलिस दलात फेरबदल करणे गरजेचे असल्‍याचे आढळून आले आहे.

  2. किनारी भागातील पर्यटन व्‍यवस्‍थापनात आमूलाग्र सुधारणा दृष्टिपथात असून, त्याद्वारे काही नवे प्रयोग अंमलात आणले जातील.

  3. पर्यटक व स्‍थानिकांत वाद घडू नयेत, त्यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध राहावे, या दृष्टीने ‍ पोलिसांना सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.

  4. संवादावर अधिक भर देण्‍यात येणार असून, कोणत्‍याही तक्रारींची तातडीने दखल घेतली जाईल.

ध्वनिप्रदूषण झाल्‍यास खैर नाही

किनारी भागात नागरिकांना कर्णकर्कश ध्वनिप्रदूषणाचा त्रास होऊ नये. त्‍यासाठी खबरदारी घ्‍या, असे आदेश पोलिसांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्‍यात आले आहे. गेल्‍या आठवड्यात मुख्‍यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत याविषयी निर्देश दिले होते. दस्‍तुरखुद्द मुख्‍यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घातल्‍याने ध्‍वनिसंप्रेषणाची मर्यादा ओलांडणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई आता अटळ आहे.

CM Pramod Sawant
CM Pramod Sawant: फ्लुची लक्षणे असलेल्यांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत; मुख्यमंत्र्याचे आवाहन

...अन् मुख्‍यमंत्री कडाडले

राज्यात खंडणीसारखे प्रकार घडत असल्‍याचे गंभीर आरोप होऊ लागल्‍याने मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी पोलिस खात्‍यातील अधिकाऱ्यांना कडक भाषेत सुनावल्‍याचे वृत्त आहे. याप्रकरणी चौकशी करून वस्‍तुनिष्‍ठ अहवाल तयार करण्‍यात आला आहे.

सत्यता तपासणार

सध्‍या विरोधकांच्‍या आरोपांतील सत्‍यासत्‍यता तपासण्‍यात येत आहे. काही पोलिसांचे बेकायदा व्‍यावसायिकांशी लागेबांधे आढळले आहेत, अशीही माहिती प्राप्‍त होत आहे.

संबंधितांवर कारवाई करण्‍यासोबतच पोलिस दलाची पुनर्रचना करून कायदा-सुव्‍यवस्‍था बळकट करण्‍यासाठी मुख्‍यमंत्र्यांनी सचिव पातळीवर खास सूचना केल्‍या आहेत.

राज्‍यातील भाजप सरकारने कायदा आणि सुव्‍यवस्‍था अबाधित राखण्‍यासाठी नेहमीच प्रशासनावर वचक ठेवला आहे. सरकारची प्रतिमा डागाळण्‍यासाठी विरोधकांकडून नाहक आरोप होतात. तरीही सरकार त्‍याकडे दुर्लक्ष न करता आरोपांची पडताळणी करते. जनहिताला नेहमीच प्राधान्‍य राहिले आहे.

- सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com