CM Pramod Sawant: फ्लुची लक्षणे असलेल्यांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत; मुख्यमंत्र्याचे आवाहन

राज्य सरकार सतर्क असल्याची माहिती
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant: गोव्यात कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे तसेच एच३एन२ एन्फ्लुएंझाचीही काही प्रकरणे राज्यात समोर आली आहेत. त्या पार्श्वभुमीवर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

CM Pramod Sawant
Selaulim Dam Goa: साळावली धरणाची उंची वाढवणार; जलस्त्रोत मंत्र्यांची माहिती

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, देशातील कोविड-19 आणि इन्फ्लूएंझा प्रकरणांमध्ये वाढ होत असताना राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. राज्य सरकार सतर्क आहे. सरकारने यापुर्वीच याबाबत दिशानिर्देश जारी केले आहेत.

लोकांनाही सावधगिरी बाळगावी लागेल. ज्यांना फ्लूसारखी लक्षणे जाणवत आहेत त्यांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत आणि आयसोलेशनचा पर्याय निवडावा.

गोव्यात मंगळवारी 23 नवे कोरोनारूग्ण आढळून आले आहेत तर सोमवारीही 17 तर रविवारी 18 कोरोना रूग्ण आढळून आले होते. कोरोना रूग्णसंख्येत चाचण्यांच्या तुलनेत चांगलीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे, त्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

दरम्यान, गोव्यात सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या 125 वर गेली आहे. देशात कोरोनाचे नवीन 699 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील सक्रिय कोरोनारूग्णांची संख्या 6,559 वर गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa ST Political Reservation
Pramod Sawant ST Reservation
Pramod Sawant Nitin Nabin Meeting
Double Engine Government Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com