Goa News : अंमली पदार्थविरोधी कारवाया वाढल्‍या, गुन्‍हे घटले; मुख्‍यमंत्र्यांचा दावा

नशामुक्त समाज घडवण्यासाठी हवे संघटित प्रयत्‍न
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

"राज्यातील ड्रग्ज विक्रेते तसेच दलालांना लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याबाबत सरकार ठाम आहे. राज्यातील अंमलीपदार्थांच्‍या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्रिय झाली असल्यानेच गुन्ह्यांचे प्रमाण यावर्षी कमी झाले आहे."

"सरकार अंमलीपदार्थ झिरो टॉलरन्स धोरणाच्या वचनबद्धतेवर ठाम आहे. नशामुक्त समाज घडवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करूया," असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थविरोधी दिनानिमित्त व्यक्त केले.

राज्यात दरवर्षी दीडशेच्या आसपास ड्रग्जसंदर्भात गुन्हे नोंद होऊन कोट्यवधींचा साठा जप्त केला जात आहे. या ड्रग्ज व्यवसायात परप्रांतीय व विदेशी नागरिकांव्यतिरिक्त गोमंतकीयांचा आकडाही वाढत आहे. हा ड्रग्ज व्यवसाय किनारपट्टी परिसरापुरताच सीमित राहिलेला नसून, तो ग्रामीण भागातही पोहोचला आहे.

CM Pramod Sawant
Vande Bharat : मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस उद्यापासून धावणार; मडगाव रेल्वे स्थानकावर जय्यत तयारी

पोलिसांनी ड्रग्ज विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले तरी त्यावरील सुनावणी दोन वर्षे उलटली तरी सुरू होत नसल्याने त्यांना सशर्त जामीन देऊन मुक्त केले जात आहे. या प्रकरणातील ड्रग्जच्या नमुन्‍यांचा फॉरेन्सिक अहवालही वेळेत सादर न केल्याने सुनावणीला उशीर होतो. त्यामुळे जामिनावर सुटलेले हे ड्रग्ज विक्रेते पुन्हा त्याच व्यवसायात सक्रिय होतात.

‘ड्रग्जला नाही म्हणा’

गोवा अमलीपदार्थविरोधी कक्षातर्फे आज बांबोळी येथील श्‍यामा मुखर्जी प्रसाद ते पणजी फेरी धक्का अशी दौड आयोजित करण्यात आली होती. ‘ड्रग्जला नाही म्हणा’ असा संदेश यामधून देण्यात आला.

अधीक्षक निधीन वाल्सन यांच्यासह काही पोलिस तसेच नागरिक सहभागी झाले होते. आजच्या युवा पिढीने ड्रग्जपासून दूर राहावे. एखादी व्यक्ती ड्रग्ज व्यवसायात असल्याची माहिती मिळाल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन अधीक्षक वाल्सन यांनी केले.

CM Pramod Sawant
नावेली पंचायतीच्या सरपंचपदी लुसिया कार्व्हालो तर उपसरपंचपदी दामू चव्हाण यांची बिनविरोध निवड

अंमलीपदार्थ सेवन हे आरोग्यासाठी घातक आहे व त्यासाठी एकजुटीने सर्वांनी त्याचा नायनाट करण्यासाठी लढा देऊया. तरुण पिढीने या ड्रग्जपासून दूर राहण्याची गरज आहे. त्यासाठी समाजात जनजागृती सरकारकडून पोलिसांमार्फत सुरू असून त्याला यश येत आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

ड्रग्जच्‍या गुन्‍ह्यांत 16 देशांचे नागरिक

अंमलीपदार्थप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विदेशी नागरिकांमध्ये नायजेरियनचे प्रमाण अधिक आहे. गेल्या अडीच वर्षात ६१ विदेशी नागरिकांना अटक झाली. त्यात ३१ नायजेरियन्‍स नागरिकांचा समावेश आहे.

त्यापाठोपाठ रशियन नागरिकांना (७) अटक झाली आहे. तसेच आयवोरियन, गुनिया, नेपाळ, युक्रेन, ऑस्ट्रिया, युगांडा, जपान, बेलारूस, नेदरलँड, लिबेरिया, टांझानिया, अमेरिका, युके, फ्रान्स या देशांच्या नागरिकांचाही समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com