Mumbai-Goa Vande Bharat Express: ओडिशा येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे गोवा-मुंबई सेमी-हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनाची तारीख पूढे ढकलण्यात आली होती.
अखेर वंदे भारत एक्सप्रेस उद्यापासून कोकण रेल्वेच्या मुंबई गोवा मार्गावर धावणार आहे. मडगाव रेल्वे स्थानकावर वंदे भारतचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते आभासी पध्दतीने होणार आहे.
गोवा-मुंबई वंदे भारत ट्रेन कधी सुरू होणार? याची प्रतिक्षा सगळ्यांना लागून राहिली होती. गोवा-मुंबई वंदे भारत ट्रेन 27 जूनपासून सुरु होणार आहे. लोकार्पणासाठी वंदे भारत मडगाव स्थानकावर दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर मडगाव रेल्वे स्थानकावर जय्यत तयारी करण्यात आली आहे.
उद्या सकाळी वंदे भारत ट्रेनचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पध्दतीने मडगाव रेल्वे स्थानकावर होणार असून मडगाव येथून सुटणार आहे. वंदे भारत ट्रेन मुंबई ते मडगाव अंतर अंदाजे 7.5 तासात पूर्ण करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी एकाच वेळी गोवा-मुंबईसह पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. गोवा-मुंबई, बेंगळुरू-हुबळी-धारवाड, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर या पाच वंदे भारत ट्रेन 27 जूनपासून धावणार आहेत.
दरम्यान, पूर्वी आठवड्यातून सहा दिवस धावणार असे जाहीर केलेल्या या ट्रेनच्या वेळापत्रकात ऐन पावसाळ्यात बदल करण्यात आला आहे. ट्रेन आता आठवड्यातून केवळ तीनच दिवस धावणार आहे.
मान्सूनमुळे कोकण रेल्वे मार्गावर वेग मार्यादा लागू करण्यात आल्याने ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, 7.50 तासांत पूर्ण होणारा हा प्रवास मान्सून काळात पूर्ण व्हायला दहा तास लागतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.