CM Pramod Sawant: निलेशाक रडपाची गरज ना! तो माझा क्लोज फ्रेंड; त्याचा त्याग वाया जाणार नाही...

मुख्यमंत्री सावंत आमदार निलेश काब्राल यांच्या पाठिशी; कुडचडे सामाजिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रूग्णालय म्हणून घोषित
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

CM Pramod Sawant: आमदार निलेश काब्राल यांच्या मागणीनुसार कुडचडे सामाजिक आरोग्य केंद्राला उपजिल्हा रूग्णालय म्हणून घोषित करत आहोत. हे जिल्ह्यातील दुसरे उपजिल्हा रूग्णालय असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

दरम्यान, निलेशाक रडपाची गरज ना! मी त्याचा क्लोज मित्र आहे. त्याचा त्याग वाया जाणार नाही, याची कुडचडकरांनीही नोंद घ्यावी, असे विश्वासही मुख्यमंत्री सावंत यांनी दिला.

नोकरभरती प्रकरणातील गैरव्यवहारावरून निलेश काब्राल यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कुडचडेमध्ये येऊन हा विश्वास दिला.

CM Pramod Sawant
गोव्यातील कन्स्ट्रक्शन कंपनीचे 17 कोटी रूपये स्वतःच्या खात्यात केले ट्रान्सफर; फोन स्विच ऑफ करून झाला फरार...

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, कुडचडेचे हे आरोग्य केंद्र गोव्यातील दुसरे उप जिल्हा रूग्णालय म्हणून आम्ही घोषित करत आहोत. निलेश काब्राल यांनी मागणी केली आणि आरोग्यमंत्री राणे यांनी तसे करण्यास काही हरकत नाही, असे सांगितले.

कदाचित सोयीसुविधा द्यायला थोडा उशिर होईल, पण प्रक्रिया घोषित करत आहोत. हे दुसरे उपजिल्हा रूग्णालय आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, मी माझ्या भाषणातील नेहमीची लाईन थोडी बदलतो. निलेशाक रडपाची गरज ना! खरंच सांगतो. निलेश आणि मी क्लोज फ्रेंड. आमदार व्हायच्या आधीपासून आम्ही मित्र आहोत. अनेकांना माहिती नसेल. आमदार तो नंतर झाला पण आम्ही त्या आधीपासून मित्र आहोत.

पक्षासाठी ज्यांनी त्याग केला आहे तो त्याग पक्ष कधीच विसरणार नाही. हे कुडचडकरांनीही लक्षात घ्यावे.

CM Pramod Sawant
Goa Cyber Crime: गोव्यातील मुलीची 8.50 लाख रूपयांची फसवणूक; आधी ऑनलाईन फ्रेंडशिप, मग लग्नाचे आमिष...

निलेश काब्राल म्हणाले की, मनोहर पर्रीकर यांच्या काळात पायाभरणी झाली होती. पण नंतर काम बंद पडले. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. आज ते पूर्ण झाले आहे. हे हॉस्पिटल कुडचडेसह आजूबाजूच्या भागातील लोकांसाठी समर्पित करत आहोत.

कोविडसारखी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर अडचण होऊ नये यादृष्टीने या हॉस्पिटलमध्ये तयारी केली आहे. 6 डायलेसिस आहेत आणि पेशंट वाढले तर 12 डायलेसिस करू. त्याबाबत आम्हाला अजिबात भीती नाही.

मुख्यमंत्रीही नेहमी म्हणतात भिवपाची गरज ना. मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना लवकरात लवकर कंत्राटी पदांवर भरती करण्याचे निर्देश दिले आहेत, असेही काब्राल म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com