स्वतःच्या आरोग्यासाठी किमान अर्धा तास ठेवा..

प्रत्येकाने किमान अर्धा तास व्यायाम, प्राणायम, योग किंवा चालावे डॉ. प्रमोद सावंत यांचा सल्ला..!
CM Pramod Sawant

CM Pramod Sawant

Dainik Gomantak
Published on
Updated on

स्वतःच्या आरोग्यासाठी किमान अर्धा तास ठेवा, असे आवाहन करतानाच कोविड (Covid) महामारीमुळे अनेक रोगांना निमंत्रण मिळाले असून त्यातून बचावण्यासाठी आरोग्याची योग्य काळजी घ्या आणि महामारीबरोबरच गोवा (Goa) सक्षम आणि सुदृढ होण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी केले. प्रत्येकाने किमान अर्धा तास व्यायाम, प्राणायम, योग किंवा चालावे असा सल्लाही डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

<div class="paragraphs"><p>CM Pramod Sawant</p></div>
महिला 'स्वावलंबणासाठी' सरकार कटिबद्ध

वेळगे येथे आज (रविवारी) गोवा शिपयार्ड लिमिटेडतर्फे मणिपाल इस्पितळ, साई नर्सिंग इन्स्ट्यूटच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहेते. या आरोग्य शिबिराचे उद्‍घाटन मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. वेदपाल तारी, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, अर्जून परब तसेच सरपंच, पंचसदस्य व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

प्रमोद सावंत म्हणाले की, सरकार आरोग्य क्षेत्रात विविध सुविधा उपलब्ध करीत आहे. या सोयीसुविधेचा लाभ ग्रामीण भागापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. गोवा शिपयार्ड लिमिटेड व इतर सहयोगींच्या सहकार्याने आयोजित आरोग्य शिबिराबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

<div class="paragraphs"><p>CM Pramod Sawant</p></div>
सरकारची फक्त घोषणाबाजी,राज्याचे मात्र नुकसान:ढवळीकर

गोपाळ सुर्लकर यांनी ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य तसेच इतर सुविधा उपलब्ध करण्यात भाजप सरकार यशस्वी झाल्याचे नमूद केले. पुढील यशस्वी वाटचालीसाठी मुख्यमंत्र्यांना सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. वेदपाल तारी यांनी प्रास्ताविकात आरोग्यविषयक सुविधांचा लाभ प्रत्येकाने घ्यावा असे आवाहन केले, आरोग्यासंबंधीच्या सोयीसुविधांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे सांगून हे खास आरोग्य शिबिर ग्रामीण भागात आयोजित केले असल्याचे म्हटले.

या आरोग्य शिबिरात ह्रदयरोग तसेच पोटाचे विकार व अन्य महत्त्वाच्या आरोग्यासंबंधीच्या तक्रारींवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून औषधे देण्यात आली. तपासणी करून घेण्यासाठी लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सूत्रसंचालन डॉ. विश्‍वराज म्हाळशेकर यांनी केले तर अर्जून परब यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com