
Sunburn festival 2024 gets green signal from Dharagal Panchayat
पेडणे: धारगळ पंचायतीने अखेर ‘सनबर्न’ला मान्यता देणारा ठराव ५ विरुद्ध ४ मतांनी संमत करून जनभावनांना तिलांजली दिली. त्यामुळे या महोत्सवाचा मार्ग सुकर झाला आहे. परंतु विरोधकांना उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवेळी आता अखेरच्या अपेक्षा आहेत.
धारगळ येथे २८ ते ३० डिसेंबर या काळात सनबर्न प्रस्तावित आहे. आज सकाळी धारगळ पंचायतीत पंचसदस्यांची खास बैठक झाली. यावेळी सनबर्नला सकारात्मक कौल मिळाला. त्यानंतर अनेकांनी पंचायतीवर टीका केली. ‘जे काही घडते ते वरूनच घडते, आम्ही फक्त बळीचे बकरे ठरतो’ अशी स्पष्ट कबुली धारगळचे सरपंच सतीश धुमाळ यांची पत्रकारांसमोर दिली. ‘सनबर्न’ला मान्यता देण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव येत असल्याचा आरोप करत, स्थानिकांनी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याची जोरदार मागणी केली आहे.
सनबर्न विषयावरून धारगळमध्ये काल विरोध व समर्थनार्थ दोन सभा झाल्या होत्या. पंचायतीने परवानगी दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून धारगळ पंचायत कार्यालयासमोर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ‘ईडीएम’ला विरोध झाला होता. असे असताना पंचायत मंडळाने समर्थनार्थ ठराव पास केला. त्यामुळे ग्रामसभेच्या ठरावाला काही महत्त्व आहे की नाही, अशा मुद्यावर चर्चा झडत आहेत. पंच भूषण नाईक व साळगावकर यांनी न्यायालयात पुन्हा जाऊ, असे सुतोवाच केले आहे.
१. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले की, ते सनबर्न महोत्सवाच्या पूर्णतः विरोधात आहेत. धारगळ ग्रामपंचायतीने सनबर्नला परवानगी दिलेली नाही. प्रसंगी आत घुसून सनबर्न बंद करण्याची तयारी आहे.
२. पेडण्यातील लोकांचा सनबर्नला विरोध आहे. मी लोकांसोबत आहे. यापूर्वीही मी माझी भूमिका जाहीर केली होती, आताही करत आहे.
३. धारगळ ग्रामपंचायतीने सनबर्नच्या आयोजकांना लेखी परवानगी दिलेली नाही.
४. पंचायत मंडळाचे सदस्य आपल्यासोबत आहेत याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.