'विद्यार्थ्यांसाठी एक्स्टरनल 10 वी परीक्षेची प्रक्रिया सुटसुटीत करा'! मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन; Gen Z बाबत म्हणाले... Watch Video

CM Pramod Sawant: ‘एक्स्टरनल’ दहावी परीक्षेची प्रक्रिया सुटसुटीत करावी, जेणेकरून गोव्यात कोणी दहावी नापास राहणार नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील ज्यांनी इयत्ता आठवी, दहावीत शाळा सोडलेली आहे, जे मानव संसाधन विकास महामंडळात सिक्युरिटी म्हणून कार्यरत आहेत, असे लोक आपल्या बढतीसाठी दहावी ‘एक्स्टरनल’ परीक्षा परराज्यात जाऊन देतात.

त्यांना सुमारे २५ हजार ते ४० हजार रूपये खर्च येतो. गोवा बोर्डाने बहिस्थः विद्यार्थ्यांसाठीची ‘एक्स्टरनल’ दहावी परीक्षेची प्रक्रिया सुटसुटीत करावी, जेणेकरून गोव्यात कोणी दहावी नापास राहणार नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

गोवा शालान्त मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे, आमदार दाजी साळकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये व इतर उपस्थित होते. दरम्यान डॉ. सावंत म्हणाले, आता येणारी पिढी ‘जेन झी’ आणि ‘जेन अल्फा’ आहे त्यांचे योग्य भवितव्य घडविण्याची जबाबदारी तुम्हा शिक्षकांच्या हाती आहे, असेही त्यांनी सांगितले.

आता वास्तुविशारद महाविद्यालय, कला महाविद्यालय या इमारतीच्या प्रकल्पासाठी आम्ही ‘इन हाऊस’ सल्लागार नेमत आहोत ज्यामुळे २ टक्के फी वाचते त्यासोबतच इमारतींमध्ये गोमंतकीय कला, चित्रे यांना प्राधान्य देण्यात येत आहे. ‘जीएसआयडीसी’ने उभारलेल्या इमारतींमध्ये देखील गोमंतकीय कलाकारांनी साकारलेली चित्रे लावण्यास प्राधान्य दिले जात आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

CM Pramod Sawant
Goa Education: 9वीच्‍या परीक्षेबाबत नवी अपडेट! शाळांनी प्रश्नपत्रिका काढण्याचा निर्णय स्थगित; गोवा बोर्डाकडून नवे परिपत्रक जारी

विद्यार्थ्यांचे कौशल्य ओळखा!

आज जे विद्यार्थी शिकत आहेत ते सर्वजण डॉक्टर किंवा अभियंते होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांमधील कौशल्य आणि कला ओळखून त्यात त्यांनी अधिक प्रवीण व्हावे, यासाठी मार्गदर्शन शिक्षकांनी करावे. हे काम पालक करू शकत नाहीत, विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखविण्याचे कार्य शिक्षकांनीच केले पाहिजे हे त्यांचे कर्तव्य असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

CM Pramod Sawant
साखळीतील किल्ल्याचं काम पूर्णत्वास, फेब्रुवारीच्या अखेरीस उद्घाटन; CM प्रमोद सावंतांची माहिती

‘आयटीआय’साठी दहावी प्रमाणपत्र देणे सुरू

जे विद्यार्थी, आठवी आणि दहावीनंतर आयटीआयमध्ये प्रवेश घेतात त्यांना दहावी प्रमाणपत्र देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. पूर्वी भाषा व इतर पेपर द्यावे लागायचे परंतु ही प्रक्रिया देखील आता सुटसुटीत करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com