Goa Education: 9वीच्‍या परीक्षेबाबत नवी अपडेट! शाळांनी प्रश्नपत्रिका काढण्याचा निर्णय स्थगित; गोवा बोर्डाकडून नवे परिपत्रक जारी

Goa Board Class 9 Exam Paper: नववीच्‍या प्रश्‍‍नपत्रिका गोवा शालान्‍त मंडळाकडूनच काढल्‍या जात होत्‍या. परंतु, ‘एनईपी’नुसार पुढील सत्रांच्‍या प्रश्‍‍नपत्रिका काढण्‍याचे अधिकार मंडळाने विद्यालयांना दिलेले होते.
Goa Board Class 9 Exam Paper
Goa Board Class 9 Exam PaperDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नव्‍या शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) नववीच्‍या प्रश्‍‍नपत्रिका शाळांनी काढाव्‍या, यासंदर्भात गोवा शालान्‍त मंडळाने (गोवा बोर्ड) काहीच दिवसांपूर्वी जारी केलेले परिपत्रक स्‍थगित ठेवले असून, मार्च महिन्‍यात होणाऱ्या परीक्षेच्‍या प्रश्‍‍नपत्रिका स्‍वत:च काढण्‍याचा निर्णय घेतला आहे. मंडळाचे सचिव विद्यादत्त नाईक यांनी याबाबतचे नवे परिपत्रक जारी केले आहे.

नववीच्‍या प्रश्‍‍नपत्रिका गोवा शालान्‍त मंडळाकडूनच काढल्‍या जात होत्‍या. परंतु, ‘एनईपी’नुसार पुढील सत्रांच्‍या प्रश्‍‍नपत्रिका काढण्‍याचे अधिकार मंडळाने विद्यालयांना दिलेले होते. मंडळाने तयार केलेल्‍या ब्‍ल्‍यू प्रिंटनुसारच शाळांनी प्रश्‍‍नपत्रिका तयार कराव्‍या आणि परीक्षेनंतर त्‍या मंडळाला सादर कराव्‍या, असे निर्देशही त्‍यांना देण्‍यात आले होते.

Goa Board Class 9 Exam Paper
Goa Education: 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! दहा टक्‍के गुण मिळवणारेही होणार उत्तीर्ण; वाचा संपूर्ण माहिती..

दरम्‍यान, मंडळाने काही दिवसांपूर्वी जारी केलेले परिपत्रक स्‍थगित ठेवले असून, मार्चमधील परीक्षेच्‍या प्रश्‍‍नपत्रिका स्‍वत:च काढण्‍याचा निर्णय घेतला आहे. सर्व भाषा, गणित, विज्ञान विषयांच्‍या प्रश्‍‍नपत्रिकांच्‍या वितरणाबाबतची माहिती लवकरच शाळांना कळवण्‍यात येईल, असेही नव्‍या परिपत्रकात म्‍हटले आहे. त्यामुळे या परिपत्रकाकडे आता लक्ष असेल.

Goa Board Class 9 Exam Paper
Goa Education: इयत्ता पहिली संदर्भात महत्वाची बातमी! 6 वर्षांपुढील मुलांनाच मिळणार प्रवेश; चालू अधिवेशनात सादर करणार विधेयक

भीती नष्‍ट होईल

आपलेच शिक्षक प्रश्‍‍नपत्रिका तयार करीत असल्‍याने विद्यार्थ्यांमधील परीक्षेसंदर्भातील भीती नष्‍ट होईल. शिवाय यामुळे मंडळाकडे प्रश्‍‍नांची बँक तयार होईल. यासाठीच नववीच्‍या प्रश्‍‍नपत्रिका शाळांना काढण्‍याचे अधिकार देण्‍यात आल्‍याची माहिती त्‍यावेळी मंडळाचे अध्‍यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिलेली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com