Chimbel Gram Sabha : स्मशानभूमीचा मुद्दा चिंबल ग्रामसभेत तापला

ग्रामस्थ आक्रमक : प्लॉटचा परवाना रद्द करण्याचा ठराव संमत
Goa News
Goa News Gomantak Digital Team
Published on
Updated on

चिंबल पंचायतीच्या अखत्यारित येणाऱ्या सर्वेक्षण क्रमांक ५७/२ जमिनीत प्लॉट्स करण्यासाठी दिलेला परवाना रद्द करण्याचा ठराव आज चिंबल ग्रामसभेत एकमताने संमत झाला. प्लॉट्स विक्री झाल्यानंतर तेथे असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायला समस्या निर्माण करणार असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्ती केली. सरपंच आणि ग्रामस्थांमध्ये स्मशानभूमीवरून ग्रामसभेत वातावरण बरेच तापले.

नगर नियोजन खात्याकडून प्रादेशिक आराखड्यानुसार परवानगी दिल्यानंतर पंचायतीने परवानगी दिल्याचे स्पष्टीकरण सरपंच संदेश शिरोडकर यांनी दिले. परंतु नगर नियोजन खात्याने परवानगी दिली असली तरी तेथे स्मशानभूमी दाखवण्यात आलेली नाही, तसेच १० मीटर रस्ता देखील दाखवण्यात आला नाही. त्याशिवाय लोकवस्ती असलेल्या ठिकाणी मोकळी जागा दाखवली आहे. ही माहिती चुकीची असून दिशाभूल करणारी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यासाठी दिलेला परवाना त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थानी केली.

Goa News
Goa Accident News: भरधाव कारचा टायर फुटला अन् वालंकिणीहून परतणारे सहा भाविक जखमी

जमिनीत प्लॉट करण्याचा परवाना एक पिरोष दलाल नामक व्यक्तीला दिली आहे, परंतु विक्री करण्याचे काम अडवलपालकर नामक बिल्डर करत आहे. त्यामुळे हा बेकायदेशीर प्रकार घडत आहे, तसेच येथे जमिनाचा दर जास्त असल्याने एक कोटी रुपये एक प्लॉटची किंमत असणार आहे. खरेदी करणारे परप्रांतीय असणार असून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्याने प्रदूषण होत असल्याचे कारण देऊन समस्या निर्माण करणार आहेत. पंचायतीने ही विक्री थांबवली नाही, तर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार म्हणून मृतदेह पुरला जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

Goa News
FC Goa : समतोल संघ, मिश्र शैलीतील संघास प्राधान्य : मानोलो मार्केझ

अनुसूचित जमाती क्षेत्र जाहीर करावे

चिंबल पंचायत क्षेत्रात अनुसूचित जमाती समुदाय बहुसंख्य असून तेथे कोणतेही विकासकाम किंवा जमीन विक्री करताना समुदायाचा विचार करण्यात यावा. अनुसूचित जमाती कष्ट करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यासाठी चिंबल पंचायत क्षेत्र सरकारने अनुसूचित जमाती क्षेत्र जाहीर करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली व तसा ठराव संमत करण्यात आला.

Goa News
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीतील पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल; जाणून घ्या ताज्या किमती

स्मशानभूमीवरून माझ्या नावाची बदनामी केली गेली आहे. या विषयावरून लोकांची दिशाभूल केली जात आहे. काही व्यक्ती दारोदारी फिरून राजकीय फायद्यासाठी हे कृत्य करत आहे.

संदेश शिरोडकर, सरपंच, चिंबल पंचायत

स्मशानभूमीवरून आज ग्रामसभा तापली. कारण परप्रांतीयांना जागा विक्री केली, तर उद्या ग्रामस्थांना याचा त्रास होणार आहे. परवाना एका व्यक्तीचा आहे, तर दुसरी व्यक्ती विक्री करत आहे.

तुकाराम कुंकळकर, ग्रामस्थ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com