Mapusa Fire:...आणि धावत्या ट्रकच्या चाकांनी अचानक घेतला पेट, म्हापसा येथील रात्रीची घटना

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
Mapusa Fire
Mapusa FireDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Fire: रस्त्यावर धावणाऱ्या भरधाव ट्रकच्या चाकांनी अचानक पेट घेतला आणि बघता बघता ट्रकची सहा चाके जळु लागली. रात्री उशीरा म्हापसा येथे ही घटना घडली. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

(Tyres Of running truck catches fire at Mapusa)

मिळालेल्या माहितीनुसार, म्हापसा येथे रात्री उशीरा एका भरधाव अवजड ट्रकच्या चाकांशी अचानक पेट घेतला. चाकाने घेतलेला पेट नंतर सहा चाकांपर्यंत विस्तारला. दरम्यान, यानंतर म्हापसा अग्निशमन दलाला संपर्क करून घटनास्थळी बोलविण्यात आले.

अग्निशमन दलाने चाकांना लागलेल्या आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविले. पोलिस देखील यावेळी घटनास्थळी दाखल झाले होते.

Mapusa Truck Fire
Mapusa Truck FireDainik Gomantak
Mapusa Fire
Panaji Traffic: पणजीतील ट्रॅफिक कंट्रोलचे काम कर्नाटकातील भाजप आमदाराच्या पुत्राला?

यामुळे चाकांना लागली आग

अवजड भरधाव ट्रकचे एक चाक अचानक पंक्चर झाले. पंक्चर झालेल्या चाकाची रिमचे रस्त्याला घर्षण झाले. या घर्षणातून ठिणग्या निर्माण झाल्या व चाकांनी पेट घेतला.

दरम्यान, या घटनेत कोणत्याही प्रकारची मोठी हानी झाली नाही. ट्रक चालक देखील सुखरूप असल्याची माहिती समोर आलीय. ट्रकच्या टायरसह बॉडीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Mapusa Truck Fire
Mapusa Truck FireDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com