Railway News: मडगाव रेल्वे स्थानकावर वाहनांसाठी शुल्क

Railway News: काँग्रेसकडून विरोध: वसुलीचे कंत्राट ‘उमिया एंटरप्राईज’ला, मात्र पावती ‘एसएनएन’ची
Goa Railway
Goa RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

Railway News: आजपासून मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावर वाहनांसाठी शुल्क लागू करण्यात आले आहे. शुल्क गोळा करण्याचे कंत्राट ‘उमिया एंटरप्राईज’ या कंपनीला देण्यात आले असले तरी शुल्क भरल्यानंतर दिलेल्या पावतीवर ‘एसएनएन एंटरप्राईज’ असे नाव आहे. त्यामुळे लोकांत संभ्रम निर्माण झाला आहे.

Goa Railway
Black Panther: ब्लॅक पॅंथर’ची दहशत वाढली; वंडाळातून मोर्चा आता तळसायकडे

दरम्यान, या शुल्क आकारणीला सावियो कुतिन्हो यांच्यासह अन्य कॉंग्रेस नेत्यांनी विरोध करून रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध केला. या संदर्भात कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक बबन घाटगे यांच्याशी ‘गोमन्तक टीव्ही’ ने संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, आज सकाळी शुल्क घेत होते. पण नंतर आपण ते बंद करायला लावले.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्या प्रमाणे विमानतळावर प्रवेशासाठी शुल्क असते, त्याप्रमाणे मडगाव रेल्वेस्थानकावर कॉम्प्युटराईज्ड पे पार्किंग सुरु केले जाईल. महिनाभरात ही सुविधा सुरू केली जाईल. सध्या आधीप्रमाणे शुल्क आकारणी करण्यास सांगितली आहे.

रेल्वे प्रशासनाकडून अद्याप ही सुविधा सुरू केलेली नाही. जुन्या पे पार्किंग नियमांचे पालन करण्यास ठेकेदारांकडून नियुक्त कामगार नव्या यंत्रणेनुसार प्रवेशद्वारावर पावती देत बाहेर पडताना वाहनांकडून शुल्क आकारत आहेत.

Goa Railway
Goa police: 15 उपनिरीक्षकांसह 183 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यावर टीका केली. आमदार आपल्या माणसांकरवी लोकांना लुटत असल्याचे डिसिल्वा यांचे म्हणणे आहे. या वेळी समीर शेख, मोरेनो रेबेलो व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांनी शुल्क आकारणीचा निषेध केला.

सामान्यांना लुटण्याची नवी पद्धत !

दरम्यान, कॉंग्रेस पक्षाने कोकण रेल्वे स्थानकावर वाहनांकडून शुल्क आकारणीवरून भाजप सरकार व खासकरून मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना लक्ष्य केले आहे. सामान्यांना लुटण्याची ही एक नवी पद्धत असल्याचे कॉंग्रेस नेते सावियो कुतिन्हो म्हणाले. शुल्क आकारणीसाठी ‘उमिया एंटरप्राईजेस’ कंपनीला कंत्राट दिले असताना काही भाजप पदाधिकारी शुल्क प्रवासी कराच्या नावाने घेत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

काही प्रवाशी रेल्वे वेळेवर चालत नाहीत. पुष्कळ रेल्वे गाड्या उशिरा सुटतात, त्यामुळे प्रवाशांच्या नातेवाईकांना तासंनतास रेल्वे स्थानकावर रहावे लागते. कुठल्याही वाहनांना रेल्वे स्थानकावर किमान एक तास तरी राहण्याची मुभा द्यावी.

-सावियो कुतिन्हो, कॉंग्रेस नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com