Black Panther: ब्लॅक पॅंथर’ची दहशत वाढली; वंडाळातून मोर्चा आता तळसायकडे

Black Panther: धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील वंडाळा गावात येणाऱ्या ब्लॅक पॅंथरचा मोर्चा आत्ता तळसाय गावाच्या दिशेने सुरु झाला आहे.
Black Panther
Black PantherDainik Gomantak
Published on
Updated on

Black Panther: धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील वंडाळा गावात येणाऱ्या ब्लॅक पॅंथरचा मोर्चा आत्ता तळसाय गावाच्या दिशेने सुरु झाला आहे. गेल्या बुधवारी तळसाय येथील एका ग्रामस्थांच्या घरातील पडवीत प्रवेश केला तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या कुत्र्याने जीवाच्या आकांताने दरवाजाला लावलेली खुर्ची उडवून घरात धाव घेतली.

Black Panther
Sanjivani Sugar Factory:... तर ‘संजीवनी’च्या जागेत प्रकल्प नको!

नव्या घरात झोपलेल्या एकाने आरडाओरड केल्यानंतर ब्लॅक पॅंथर पळाला. कुत्रा आत धावत आल्याने त्याचा जीव वाचला, अशी माहिती मंजुळा हिने दिली.

वनविभागाकडून पिंजरा

वंडाळा येथे अतुल नाईक यांच्या घरी सतत हा ब्लॅक पॅंथर येत असल्याने वन खात्याने मंगळवारी रात्री त्यांच्या घरा शेजारी ब्लॅक पॅंथरला पकडण्यासाठी पिंजरा लावलेला आहे. पण ब्लॅक पॅंथरने आपला मोर्चा तळसायकडे वळविल्याने वंडाळा या ठिकाणी गुरुवारपर्यंत तरी आला नव्हता. वंडाळा गावात गेला तर ब्लॅक पॅंथर पिंजऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

धारबांदोड्यात ब्लॅक पॅंथर

वन खात्याचे कर्मचारी गेल्यानंतर पहाटे 4-15 वाजता हा पॅंथर कॅमेऱ्यात कैद झाला, अशी माहिती अतूल यांनी दिली. गेल्या तीन ते चार महिन्यात ब्लॅक पँथरने गावातील पाळीव कुत्री व मांजरांची शिकार केली. या भागात सध्या भीतीचे वातावरण असून त्यांनी ब्लॅक पॅंथरचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

पूर्वी गावात कुठेही बिबटा किंवा ब्लॅक पॅंथर दिसल्यानंतर वन खात्यात तक्रार दिल्यास तात्काळ त्या ठिकाणी पिंजरा लावून हैदोस घालणाऱ्या या रानटी जनावराला पकडत होते. पण गेल्या काही वर्षापासून पिंजरा लावायचा असल्यास वनखात्याकडे अर्ज द्यावा लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com