पूल नाही, फक्त लाकडी काठ्यांचा आधार! पावसाळ्यात बणकल गावातील ग्रामस्थांचा दरवर्षी मृत्यूशी खेळ; खासदारांकडून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी

Captain Viriato Fernandes Sanguem Visit: कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगे काँग्रेस ब्लॉकचे निमंत्रक जितेंद्र नाईक यांच्यासह सांगे तालुक्यातील बणकल या दुर्गम भागातील गावाला भेट दिली.
Captain Viriato Fernandes
Goa Rural InfrastructureDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगे काँग्रेस ब्लॉकचे निमंत्रक जितेंद्र नाईक यांच्यासह सांगे तालुक्यातील बणकल या दुर्गम भागातील गावाला भेट दिली. या भागात पूल नसल्याने जी समस्या उद्भवली आहे त्यावर आवाज उठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या गावातील ग्रामस्थांना दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते.

नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात या गावाचा मुख्य भूमीशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटतो. नदी ओलांडण्यासाठी ग्रामस्थांना स्वतः तयार केलेल्या लाकडी काठ्यांचा तात्पुरत्या पुलाचा आधार घ्यावा लागतो.

Captain Viriato Fernandes
Old Zuari Bridge Closure: प्रवाशांनो लक्ष द्या! शनिवारी जुना झुआरी पूल राहणार बंद, नियमित तपासणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय; पर्यायी मार्गाचा करा वापर

खासदार विरियातो फर्नांडिस यांनी येथील परिस्थितीची पाहणी करून ग्रामस्थांना दिलासा दिला. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकारी आणि जमीन मालकांशी चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. दरम्यान त्यांनी तळसय या गावाला भेट देऊन तिथल्या लोकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते त्याची माहिती घेऊन त्यावर काही उपाय काढता येणे शक्य आहे का हेही पाहून घेऊ असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com