Goa Politics: नव्‍या राजकीय खेळीस सुरवात, सरदेसाई-पाटकर एकत्र; तिसऱ्या आघाडीची शक्‍यता

Vijay Sardesai Amit Patkar: काँग्रेसने पायउतार करण्‍यास भाग पाडल्‍याने अमित पाटकर हे सध्‍या नाराज आहेत. दुसऱ्या बाजूने काँग्रेसकडून योग्‍य तो मार्ग मिळत नाही, अशी भावना गोवा फॉरवर्ड पक्षामध्‍ये तयार झालेली आहे.
Vijay Sardesai Amit Patkar
Vijay Sardesai Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : वेळसाव येथे सोमवारी झालेल्‍या आंदोलनाच्‍यावेळी गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर हे एकत्रित दिसणे, ही वरवर जरी साधीशी गोष्‍ट वाटत असली तरी प्रत्‍यक्षात एका नवीन राजकीय खेळीचा हा प्रारंभ असण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.

भाजप व काँग्रेस या दोन्‍ही पक्षांना बाजूला ठेवून गोव्‍यात ही तिसरी आघाडी तयार केली जाईल, अशी जी शक्‍यता व्‍यक्‍त केली जाते, त्‍याची ही सुरवात असण्‍याची शक्‍यताही व्‍यक्‍त केली जात आहे.

सध्‍या गोवा फॉरवर्डने काँग्रेसबरोबर युती करण्‍याची बोलणी स्‍थगित ठेवली आहे तर दुसऱ्याबाजूने प्रदेशाध्‍यक्षपदावरून खाली उतरविल्‍याने नाराज झालेले अमित पाटकर हे ‘गोवा काँग्रेस’ या नावाचा नवीन पक्ष सुरू करू पाहात आहेत, अशी राजकीय चर्चा आहे. अशा परिस्‍थितीत विजय आणि अमित एकत्र दिसल्‍याने राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्‍या शक्‍यता व्‍यक्‍त केल्‍या जात आहेत.

Vijay Sardesai Amit Patkar
Goa ST Reservation: मोदी सरकारचा आदिवासी समाजाला मोठा दिलासा! एसटी आरक्षण प्रक्रियेला वेग; 6 ऑगस्टपासून लागू होणार नवा कायदा

दरम्यान, काँग्रेसने पायउतार करण्‍यास भाग पाडल्‍याने अमित पाटकर हे सध्‍या नाराज आहेत. दुसऱ्या बाजूने काँग्रेसकडून योग्‍य तो मार्ग मिळत नाही, अशी भावना गोवा फॉरवर्ड पक्षामध्‍ये तयार झालेली आहे. याचाच परिपाक म्‍हणून गोवा फॉरवर्डने काँग्रेसकडे युतीची बोलणी बंद केली आहे. अशा परिस्‍थितीत गोवा फॉरवर्ड नव्‍याने स्‍थापन होणारी गोवा काँग्रेस पार्टी, आम आदमी पार्टी आणि ‘आरजी’ पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी तयार करण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. असे झाल्‍यास काँग्रेस स्‍वत:च्‍या बालेकिल्‍ल्‍यात कमजोर होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.

आमचे प्रयत्‍न सुरू : चोडणकर

काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना, गाेवा फॉरवर्डने जरी युतीची बोलणी स्‍थगित केली असली तरी ‘आप’ आणि ‘आरजी’कडे आमची बोलणी सुरू आहेत. सर्व भाजपविरोधी पक्षांना घेऊन एकत्रितरित्‍या भाजपविरोधात लढण्‍यासाठी आमचे प्रयत्‍न सुरू आहेत आणि आमच्‍या प्रयत्‍नांना नक्‍कीच यश येईल, असे सांगितले.

Vijay Sardesai Amit Patkar
Goa ST Reservation: आदिवासींचा दबाव कायम! आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत माघार नाही; गोवा सरकारवर 'उटा'चा पुन्हा मोठा प्रहार

हा ‘राजकीय संदेश’ असावा!

राजकीय विश्‍लेषक ॲड. क्‍लिओफात आल्‍मेदा कुतिन्‍हो यांना याबद्दल विचारले असता, वरवर जरी ही साधी गोष्‍ट वाटत असली तरी प्रत्‍यक्षात तो एक हेतुपुरस्‍सररित्‍या दिलेला ‘राजकीय संदेश’ असावा, अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली तर राधाराव ग्रासियस यांनी अमित पाटकर हे अजूनही काँग्रेसमध्‍ये आहेत आणि ‘गोवा काँग्रेस’ या पक्षाची अजून स्‍थापनाही झालेली नाही. अशा परिस्‍थितीत एका आंदोलनात जर दोन राजकीय पक्षांचे नेते एकत्र आले तर त्‍यावरून कुठलाही निष्‍कर्ष काढणे सध्‍याच्‍या स्‍थितीत चुकीचे ठरेल, अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.

आमची तशीही तयारी : सरदेसाई

युतीसंदर्भातील बोलणीबद्दल विजय सरदेसाई यांना विचारले असता, सध्‍या आम्‍ही बाेलणी बंद केलेली आहे आणि ती अद्याप सुरू झालेली नाही. सर्व भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपच्‍या विरोधात एकत्रित लढा द्यावा, अशी गोव्‍यात जनभावना आहे. आणि या जनभावनेची कदर करून आम्‍ही सध्‍या तूर्त युतीची बोलणी स्‍थगित ठेवली आहे. उद्या गरज पडल्‍यास गोवा राखून ठेवण्‍यासाठी स्‍वतंत्रपणे निवडणूक लढवावी लागल्‍यास त्‍यासाठी आमची तयारी आहे, असे सूचक उद्‍गार त्यांनी काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com