Goa News: तिळारी धरणाच्या गोव्यातील उपकालव्याला गळती, लाखो लिटर पाणी गेले वाया; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa Marathi Breaking News: गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि हिवाळी अधिवेशन २०२५ बद्दल ताज्या अपडेट्स
Goa News: तिळारी धरणाच्या गोव्यातील उपकालव्याला गळती, लाखो लिटर पाणी गेले वाया; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी
Published on
Updated on

तिळारी धरणाच्या गोव्यातील उपकालव्याला गळती, लाखो लिटर पाणी गेले वाया

तिळारी धरणाच्या गोव्यात जाणाऱ्या कालव्याच्या सासोली येथील उपकालव्याला गळती लागली, ज्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. सासोली, पाट्ये पुनर्वसन, गोव्यातील सीमावर्ती भागाताली शेतकऱ्यांची गैरसोय.

Rent-A-Car कारचा सांगोल्डा येथे अपघात, तिघे जखमी

सांगोल्डा येथे Rent-a-Car कारचा अपघात झाला असून, यात तिघे जखमी झाले आहेत. धावती कार इलेक्ट्रिक पोलला धडकून हा अपघात झाला.

'यावेळी बाबू आजगांवकर मला पाठिंबा देतील'; आमदार प्रवीण आर्लेकर

माजी आमदार बाबू आजगांवकर यावेळी मला पाठिंबा देतील, असे वक्तव्य पेडण्याचे विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप दोन वर्षे बाकी असताना विद्यमान आणि माजी आमदारांसह इच्छुकांच्या राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत.

Goa Politics: तानावडे यांनी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांची भेट घेतली

राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी आज भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांची संसदेतील त्यांच्या चेंबरमध्ये भेट घेतली.

Goa News: बैलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

बैलाच्या हल्ल्यात पाणजकोणी येथील रवींद्र गव्हाणकर यांचा दुर्दैवी मृत्यू.

Key Points In Governor Address: राज्यपालांच्या अभिभाषणातील महत्वाचे मुद्दे

- पारदर्शक नोकरभरतीसाठी कर्मचारी भरती आयोगाची स्थापना

- सहा कल्याणकारी योजनांवर आर्थिक वर्षात २७५.९ कोटी खर्च

- वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून २९.२८ कोटी दंड वसूल

- स्तन कर्करोग तपासणीअंतर्गत १ लाख महिलांंची तपासणी

- २०२७-२८ पर्यंत सर्व वर्गांसाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार

- गोव्यात गुन्हे तपासाचे प्रमाण ८८.३८ टक्के

Goa News: तिळारी धरणाच्या गोव्यातील उपकालव्याला गळती, लाखो लिटर पाणी गेले वाया; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी
एस्मा रद्द करा, कदंबाच्या कर्मचाऱ्यांना थकबाकी द्या; 'आयटक' कामगारांचे पणजीत आंदोलन

विजय सरदेसाईंकडून राज्यपालांच्या अभिभाषणावेळी फलक हातात घेऊन निषेध

"नोकरेखातीर दी रोख, भाजपा सरकाराची एकूच मोख; ओगी रावल्यार सुटलो, आवाज काडटा ताका ठोक"

राज्यपालांच्या पूर्ण अभिभाषणावेळी विजय सरदेसाईंकडून वरील फलक हातात घेऊन उभे राहत निषेध.

Goa Assembly Winter Session Live 2025 Live | Watch Here

Governor P. S. Shreedharan Pillai Addressing Goa Assembly Winter Session Watch Live

राज्यपालांचे अभिभाषण सुरू, विजयकडून निषेधाचा फलक

राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधी आमदारांकडून बहिष्कार. विजय सरदेसाई हातात निषेधाचा फलक घेऊन सभागृहात आपल्या जागेवर उभे.

Goa Governor Speech: विरोधकांच्या गोंधळात राज्यपालांच्या अभिभाषणाला सुरुवात

हिवाळी अधिवेशनाला गोंधळाने सुरुवात. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या सुरुवातीलाच विरोधकांकडून गोंधळ. गोंधळ न थांबविल्यास सभागृहाबाहेर काढण्याची सभापतींची तंबी.

Sudin Dhavlikar: माझ्या मतदारसंघात धर्म आणि संस्कृतीसाठी काम करणारी लोकं आहेत: ढवळीकर

माझ्या मतदारसंघात धर्म आणि संस्कृतीसाठी काम करणारे माझ्यापेक्षाही खूप मोठे लोक आहेत: मंत्री सुदिन ढवळीकर

Goa News: तिळारी धरणाच्या गोव्यातील उपकालव्याला गळती, लाखो लिटर पाणी गेले वाया; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी
Goa Crime: धक्कादायक! कुत्र्याच्या तीन पिल्लांना वीष देऊन ठार मारलं; कुंडईतील अंगावर शहारा आणणारी घटना

Goa Winter Assembly Session: गोवा विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात

गोवा विधानसभेचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन आज गुरुवारी ०५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरु होणार आहे. सकाळी ११: ३० वाजता होणाऱ्या या अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या अभिभाषणाने होणार आहे.

Goa Crime: बिहारमधील इसम १८,५०० रुपयांच्या गांजासह जेरबंद

बेतोडा औद्योगिक वसाहतीजवळ पोलिसांचा छापा;संदीप कुमार चौधरी (बिहार) १८,५०० रुपयांच्या गांजासह जेरबंद.

Goa To Prayagraj Train: गोवा ते प्रयागराज प्रवासाला आजपासून सुरुवात

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता करमाळी रेल्वे स्थानकावरुन गोवा ते प्रयागराज या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

Goa News: मासोर्डेत फुटबॉल टर्फ मैदान प्रकल्पाचे उद्घाटन

वाळपई नगरपालिका व गोवा राज्य शहरी विकास एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने मासोर्डेत बुधवारी(६ फेब्रुवारी) नैसर्गिक गवताचा फुटबॉल टर्फ मैदान प्रकल्पाचे मंत्री विश्वजीत राणे, आमदार डॉ देविया राणे यांचा हस्ते व इतरांचा उपस्थिती उद्घाटन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com