Mahakumbh 2025: महाकुंभात मोफत ‘डुबकी’ मारण्‍यास अनेक आतुर! रेल्वेगाड्यांची घोषणा गोव्यातील नेत्यांसाठी 'डोकेदुखी'

Mahakumbh Free Trains: आमदारांच्या पातळीवर महाकुंभासाठी जाणाऱ्यांची यादी तयार केली तर त्यांच्या सर्व खर्चाची जबाबदारी घ्यावी लागेल असेही काहीजणांना वाटते.
Mahakumbh Free Trains Goa
Mahakumbh Free Railway GoaCanva
Published on
Updated on

Mahakumbh Free Railway Service Goa

पणजी: प्रयागराज येथील महाकुंभासाठी गोव्यातून तीन मोफत रेल्वेगाड्या सोडण्याची सरकारने केलेली घोषणा आमदार आणि इतर नेत्यांसाठी आता डोकेदुखी ठरू लागली आहे. अनेकांनी त्यांच्याकडे ‘आम्हांलाही कुंभमेळ्‍याला पाठवा’ असा तगादा लावला आहे. त्‍यामुळे नेत्‍यांनी समाजकल्याण खात्याकडे आपले पन्नास कार्यकर्ते पाठवता येतील काय, अशी विचारणा करणे सुरू केले आहे.

प्रयागराजच्या अलीकडे साडेचार किलोमीटरवर असलेल्या रेल्वेस्थानकापर्यंतच या रेल्वे जाणार आहेत. तेथून प्रत्येकाने आपल्या जबाबदारीवर महाकुंभाला २४ तासांत जाऊन यायचे आहे. यादरम्यानच्या काळात कोणतीही अप्रिय घटना घडली तर सरकार जबाबदार नसेल, असे हमीपत्र प्रत्येक प्रवाशाकडून भरून घेतले जाणार आहे.

त्यामुळे नेतेसुद्धा घाबरले आहेत. एखादी व्यक्ती त्या प्रचंड गर्दीत बेपत्ता झाली आणि तिला येणारी रेल्वे चुकली तरी त्याचे पडसाद काय उमटतील, याची कल्पना करून काही नेत्यांनी तर त्यांच्या कार्यकर्त्यांना तुम्ही स्वतःच समाजकल्याण खात्यात जाऊन आरक्षण करा, असा सल्ला दिला आहे.

आमदारांच्या पातळीवर महाकुंभासाठी जाणाऱ्यांची यादी तयार केली तर त्यांच्या सर्व खर्चाची जबाबदारी घ्यावी लागेल असेही काहीजणांना वाटते. महाकुंभाच्या ठिकाणी साडेचार किलोमीटरवरून पोचण्याचा तसेच अन्‍य खर्च प्रवाशाला करावा लागणार आहे. त्यामुळेही एकगठ्ठा आरक्षणापासून काहींनी अंग काढून घेतले आहे. काही नेत्यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हमीपत्रे भरून खात्यात पोच करण्यापुरतीच भूमिका मर्यादित ठेवण्याच्या सूचना केल्याचे समजते.

Mahakumbh Free Trains Goa
Mahakumbh: गोव्याच्या मंत्री, आमदारांचा 'बहुचर्चित' महाकुंभ दौरा रद्द; मौनी अमावस्येच्या गर्दीमुळे बदलली तारीख

दूरध्वनी क्रमांक चालत नसल्याच्या तक्रारी

या मोफत रेल्वेगाड्यांतून प्रवास करण्यासाठी संपर्क करण्याकरिता सरकारने जाहीर केलेला ०८३२-२२३२२५७ हा दूरध्वनी क्रमांक चालत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. महाकुंभासाठी ६, १३ व २१ फेब्रुवारीला मडगावहून रेल्वे सोडण्यात येणार आहे. प्रत्येक रेल्वेमागे तब्बल १ कोटी १६ लाख रुपयांचा खर्च राज्य सरकार करणार आहे.

Mahakumbh Free Trains Goa
Mahakumbh: गोव्याचे मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांसह शंभरजणांचा खास विमानाने 'महाकुंभ'दौरा! कुणाच्या खर्चाने होणार 'पावन'?

‘पाहतो...नंतर सांगतो’

एकंदरीत सध्या मोफत रेल्वेंमुळे नेत्यांना डोकेदुखीला सामोरे जावे लागत आहे. जो-तो त्यांच्यामागे चार-पाच नावे घेऊन ‘आमची महाकुंभाला जाण्याची सोय करा’ असा तगादा लावत आहे. ‘पाहतो...सांगतो’ असे सांगून या कार्यकर्त्यांपासून सुटका करून घेण्याची वेळ या नेत्यांवर सध्या आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com