एस्मा रद्द करा, कदंबाच्या कर्मचाऱ्यांना थकबाकी द्या; 'आयटक' कामगारांचे पणजीत आंदोलन

AITUC on Union Budget: अखिल भारतीय ट्रेड यूनियन काँग्रेसने (आयटक) २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
Budget 2025: कॉर्पोरेट घराण्यासाठी केंद्राचा अर्थसंकल्प, ‘आयटक’चा घणाघात; गोव्यात कामगारांचे आंदोलन
AITUC WorkerDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: अखिल भारतीय ट्रेड यूनियन काँग्रेसने (आयटक) २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून हा अर्थसंकल्प मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आला आहे, असे मत आयटक सरचिणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी व्यक्त केले आहे.

मध्यवर्गीयांसाठी कर सवलतीत वाढ करण्यात आली असली, तरी महागाई, महागडे आरोग्यसेवा, शिक्षण आणि वेतन स्थिरतेमुळे या सवलतींचा फारसा फायदा होणार नाही. केंद्रीय ट्रेड युनियन्स आणि स्वतंत्र संघटनांनी ५ फेब्रुवारी रोजी या अर्थसंकल्पाच्या विरोधात देशव्यापी आंदोलनाचे आवाहन केले होते. त्यांनुसार पणजी आझाद मैदान येथे गोव्यातील संघटनेने हे आंदोलन केले. विमा क्षेत्रात १०० टक्के परकीय थेट गुंतवणुकीला परवानगी देण्याच्या निर्णयामुळे सामान्य नागरिक आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होईल, असे आयटकने यावेळी सांगितले.

बेकारी, कृषी संकट, महागाई (Inflation) आणि सार्वजनिक क्षेत्राच्या खासगीकरणासारख्या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष सरकारने केल्याचा दावा आयटकने केला. तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी अत्यल्प निधी वाटप केल्यामुळे गरीब, वंचित आणि मध्यमवर्गीयांना या सेवांचा लाभ घेणे कठीण होणार आहे, असेही त्यांनी लक्षात आणून दिले.

सरकार नवीन योजना जाहीर करते, परंतु जुन्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती देत नाही. हा अर्थसंकल्प असंघटित क्षेत्रातील कामगार, बेरोजगार युवक, गरीब आणि शेतकऱ्यांच्या (Farmers) समस्यांकडे दुर्लक्ष करतो. मनरेगा योजनेच्या निधीत वाढ करण्याची मागणी नाकारण्यात आली असून, शहरी रोजगार हमी योजनेची मागणीही दुर्लक्षित करण्यात आली आहे, असे आयटकने नमूद केले.

अशा आहेत मागण्या

  • फार्मा कंपन्यांमध्ये संपावर बंदी घालणारी अधिसूचना रद्द करावी.

  • पंचायत कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करावा.

  • सार्वजनिक बांधकाम खात्यामधील कंत्राटी कामगारांचे नियमितीकरण करावे.

  • संजिवनी सहकारी साखर कारखान्याच्या २०० कामगारांचे भविष्य निश्चित करावे.

  • गोवा राज्य सहकारी दूध उत्पादक संघाच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ द्यावी.

  • संजय सेंटर स्कूल फॉर स्पेशल एज्युकेशनच्या महिला कर्मचाऱ्यांना त्रास देणे थांबवावे आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या कायदेशीर हक्कांचे पैसे द्यावेत.

  • कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना थकबाकी द्यावी.

  • शिक्षण विभागातील पूर्व-प्राथमिक साहाय्यकांना योग्य वेतन द्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

US Bank Layoffs India 80 Customer Service Employees
Central Government Employees DA Hike 4 Percent
8th Pay Commission Update
Hardik Pandya Mumbai Indians trade
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com