
सत्तरी: गोव्यातील पर्यटनक्षेत्रातील एक महत्वाचं ठिकाण म्हणजे बोंडला वन्यजीव अभयारण्य, मात्र हे अभयारण्य आता काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. इथल्या तीन उद मांजरांना आणि दोन जंगली मांजरांना संसर्गजन्य आजाराने ग्रासल्यामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे अभयारण्य बंद ठेवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलाय. या दुर्दैवी घटनेनंतर १ एप्रिलपासून प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अभयारण्यात नेमका कोणत्या विषाणूमुळे हे मृत्यू झाले हे अद्याप समजलेलं नाही. उद मांजर आणि रानमांजरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची तपासणी करण्यासाठी मृत प्राण्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक कमल दत्ता यांनी दिली. या घटनेनंतर आणखीन कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली आहे.
प्रयोगशाळेचा अहवाल तपासून पुढील निर्णय घेतला जाणार आहे, जर प्रयोगशाळेने सकारात्मक माहिती दिला तर अभयारण्य पुन्हा सुरु केलं जाणार आहे.
आतापर्यंत सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, मांजरांचा मृत्यू ६ ते ९ मार्च दरम्यान झाला होता. मात्र, अभयारण्य क्वारंटाईन करण्याचे आदेश ३० मार्चनंतर देण्यात आले होते.
"अभयारण्यातील सर्व असुरक्षित प्राण्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या आजारामुळे तीन उदमांजर आणि रान मांजरांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित उद मांजर आणि रान मांजर निरोगी आहेत आणि त्यांच्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. अभयारण्यात काम करणारे आमचे कर्मचारीही मास्क वापरत आहेत आणि इतर आवश्यक खबरदारी घेत आहेत." अशी माहिती राज्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.