Sylvan Bondla: बोंडला अभयारण्यातील ‘सिल्वन’ इको-टुरिझम रिसॉर्टचे लोकार्पण, 400 ते 500 स्‍थानिकांना मिळणार रोजगार

Sylvan Ecotourism Cottages Bondla: गोवा वनविकास महामंडळाने इको टुरिझम डेव्हलपमेंटअंतर्गत पहिला प्रकल्प विकसित केला आहे.
Sylvan Ecotourism Cottages Bondla
Sylvan Ecotourism Cottages Bondla: Dainik Gomantak
Published on
Updated on

Sylvan Ecotourism Cottages Bondla Opening

फोंडा: गोवा वनविकास महामंडळाने इको टुरिझम डेव्हलपमेंटअंतर्गत पहिला प्रकल्प विकसित केला आहे. बोंडला वन्यजीव अभयारण्यातील ‘सिल्वन’ या इको-टुरिझम रिसॉर्टचे लोकार्पण आज सोमवारी वनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

ते म्‍हणाले, उसगावातील सुमारे चारशे ते पाचशे लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या प्रकल्‍पाचा आणखी विस्तार करण्‍यात येईल. तसेच भविष्यात जीएफडीसी पर्यावरण-पर्यटनाशी संबंधित नोडल एजन्सी म्हणून काम करेल.

यावेळी गोवा वनविकास महामंडळाच्‍या अध्यक्षा आमदार डॉ. दिव्‍या राणे, प्रधान मुख्य वनसंरक्षक कमल डी. (आयएफएस), वन्यजीव मुख्य वॉर्डन प्रवीणकुमार राघव (आयएफएस) आणि मान्यवर उपस्थित होते.

Sylvan Ecotourism Cottages Bondla
Goa BJP: 'आगामी निवडणुकांसाठी सर्व मंडळांनी सज्ज राहावे'; सदस्य नोंदणी अपयशावरून तानावडेंनी केले सूचक विधान

राज्यात इको-टुरिझमला चालना देण्याची गरज आहे. तसेच त्‍या भागातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्‍यात येईल. बोंडला येथील १० रिसॉर्टसह ‘सिल्वन’ प्रकल्पाचा आकार बदलून लोकांच्या मोठ्या गटासाठी पुनर्विकास केला जाऊ शकतो. मी आधीच सीसीएफसोबत कल्पना मांडली असून त्यावर सहमती झाली आहे. त्‍यामुळे बोंडला येथे सुमारे ४०० ते ५०० लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असे राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com