‘कुर्डी अर्बन’ची नाहक बदनामी करणाऱ्याविरुद्ध तक्रार करणार!...

भागधारकांनी सावध रहावे, अफवांना बळी पडू नये, असे आवाहन संचालक मंडळाने यावेळी केले.
Goa Banking News
Goa Banking NewsDainik Gomantak

वाडे-कुर्डी येथील कुर्डी अर्बन पतसंस्‍थेची बदनामी करण्याचा प्रकार एका व्यक्तीकडून चालला आहे. याप्रकरणी तक्रार करण्यात येणार असून त्यासाठी सहकार निबंधकांचा सल्ला घेतला असल्याचे अध्यक्ष फ्रान्सिस मास्कारेन्हस व उपाध्यक्ष संजय कुर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सोसायटीचे इतर संचालकही उपस्थित होते.

Goa Banking News
Rakshabandhan Festival: बाजारपेठा सजल्‍या, मात्र राख्‍यांच्‍या विक्रीत घट!

पतसंस्‍थेने उत्कृष्ट कार्याच्या बळावर दोनवेळा सर्वोत्कृष्टता पुरस्कार पटकावलाय. अडीच हजार भागधारक असलेल्या या सोसायटीत कुठलाही घोटाळा झालेला नाही, उलट भागधारकांना जास्तीत जास्त लाभांश देणारी ही पतसंस्था आहे.

तिची जास्त मदार संजीवनी साखर कारखान्यावर आहे. ऊसउत्पादकांना आवश्‍यक निधी उपलब्ध करण्याबरोबरच त्यांना कर्ज देऊन त्‍यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न पतसंस्थेने केला आहे. मात्र सध्या संजीवनीचे कामकाज थंडावल्याने परिणाम झालाय, असे ते म्‍हणाले.

Goa Banking News
Goa Food Court: कुडचडेतील फूडकोर्टचा प्रश्‍‍न मार्गी!

भागधारकांनी अफवांना बळी पडू नये

पतसंस्थेचे सध्‍या केवळ चार ते पाच ऊसउत्पादक थकबाकीदार आहेत. मात्र वैयक्तिक कर्ज घेतलेल्यांची संख्या जास्त आहे. या लोकांकडून पैसे वसूल करण्यासाठी त्‍यांना आवश्‍यक ते सहकार्य करण्‍याबरोबरच इतर बाबी समजावून वैयक्तिक संपर्क साधण्यात आला.

मात्र एका व्यक्तीने, ज्याचा या पतसंस्थेशी दुरान्वयेही संबंध नाही, त्याने पतसंस्थेसंबंधी आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमांवर टाकला आहे. अशा व्यक्तीपासून भागधारकांनी सावध रहावे, अफवांना बळी पडू नये, असे आवाहन संचालक मंडळाने यावेळी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com