Bicholim Raksha Bandhan: बाजारपेठा सजल्‍या, मात्र राख्‍यांच्‍या विक्रीत घट!

Bicholim Raksha Bandhan: खरेदी मंदावली : स्‍टॉल्‍स, प्रदर्शने, ऑनलाईन खरेदीचा विपरित परिणाम; विक्रेते चिंतेत
Bicholim Raksha Bandhan
Bicholim Raksha BandhanDainik Gomantak

Raksha Bandhan Shopping in Bicholim: रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठा सजल्‍या आहेत. मात्र वाढत चाललेले राख्‍यांचे स्‍टॉल्‍स, ऑनलाईन खरेदी आणि प्रदर्शने यामुळे बाजारात राख्यांच्या विक्रीवर परिणाम झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

डिचोलीचा बाजारातही रंगबेरंगी व आकर्षक राख्या दाखल झाल्‍या आहेत. परंतु आज मंगळवारी संध्‍याकाळपर्यंत राख्यांची 50 टक्केही विक्री झाली नसल्याचे विक्रेत्‍यांनी सांगितले.

Bicholim Raksha Bandhan
Valpoi Health Center: वाळपई आरोग्य केंद्रात लवकरच सर्व शस्त्रक्रिया

रक्षाबंधन म्हणजेच बहीण-भावाच्या अतूट नात्याचे महत्व सांगणारा सण. उद्या बुधवारी हा सण साजरा होत आहे.

रक्षाबंधनाला अवघेच क्षण राहिल्याने सर्वत्र लगबग सुरू झाली आहे. डिचोलीचा बाजार राख्यांनी फुलला आहे.

पारंपरिक दुकानांसह शहरातील बाजार संकुलातील जागेत थाटण्यात आलेले स्टॉल्‍स राख्यांनी सजले आहेत.

लहान मुलांसाठी खास कलाकुसरीच्या राख्या दाखल झाल्‍या असून त्या लक्ष वेधून घेत आहेत. २० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंतच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. बाजार राख्यांनी सजला असला तरी यंदा खरेदीसाठी तसा थंडाच प्रतिसाद दिसून आला.

Bicholim Raksha Bandhan
Goa News: ‘आप’चे हेंझल फर्नांडिस यांचे ओबीसी प्रमाणपत्र ठरले अवैध; खंडपीठाचा निवाडा

रक्षाबंधनाच्या पूर्वदिनी म्हणजेच आज बाजारात प्रचंड गर्दी उसळेल अशी अपेक्षा होती. मात्र विक्रेत्यांचा अपेक्षाभंग झाला. आज संध्याकाळीही खरेदीसाठी गर्दी दिसून आली नाही.

कोविडनंतर गेल्यावर्षी राखी विक्रीचा व्यवसाय स्थिरावला होता. यंदा मोठ्या प्रमाणात राख्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

खरेदीला जोर येईल अशी आशा होती. मात्र अपेक्षाभंग झाला. यापूर्वी रक्षाबंधनाला दोन-तीन दिवस असतानाच राख्‍या खरेदीसाठी झुंबड उडायची. यंदा अजून ५० टक्केही व्यवसाय झालेला नाही. - शुभांगी काणेकर, राखीविक्रेती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com