Goa Food Court: कुडचडेतील फूडकोर्टचा प्रश्‍‍न मार्गी!

कुडचडेत बैठक : दोन्‍ही प्रकल्‍प भाडेपट्टीवर देण्‍याचा निर्णय; गंगाजळीत पडणार भर
Goa Food Court
Goa Food CourtDainik Gomantak
Published on
Updated on

कुडचडे पालिकेची कोट्यवधी रुपयांची वसुली तसेच महसूल येणे बाकी आहे. त्‍यामुळे प्रत्‍येक महिन्‍याला कर्मचाऱ्यांना पगार देतानासुद्धा पालिकेच्‍या नाकी-नऊ येतात. आज झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत त्‍यावर चर्चा झाली. तसेच कुडचडे पालिका प्रशासकीय इमारत व फूडकोर्टची निविदा मार्गी लावण्यास मंडळाला अखेर यश आले.

Goa Food Court
Goa News: ‘आप’चे हेंझल फर्नांडिस यांचे ओबीसी प्रमाणपत्र ठरले अवैध; खंडपीठाचा निवाडा

सदर इमारत भाडेपट्टीवर देऊन महिन्याकाठी दीड लाख रुपये पालिकेला मिळतील. तसेच फूडकोर्टद्वारे वार्षिक १९.५० लाखांचा महसूल येईल, असे नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांनी सांगितले. या बैठकीला कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांचीही उपस्थिती होती.

कुडचडे पालिका प्रशासकीय इमारत व फूडकोर्टचा प्रश्न मार्गी लागल्याचे तसेच पालिका क्षेत्रातील विकासकामे पालिका मंडळाच्या सहकार्याने लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे काब्राल यांनी सांगितले. कुडचडे भागात मोकाट फिरणारी भटकी गुरे व कुत्रे यांच्‍यावर आळा आणण्यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या जागेतच वेगळी जागा तयार करून बिगरसरकारी संस्थेतर्फे त्यांची देखभाल करण्यावर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या एक वर्षापासून पालिकेची प्रशासकीय इमारत भाडेपट्टीवर देण्‍यासाठी निविदा काढण्यात येत होत्या. तसेच फेब्रुवारीपासून दोनवेळा फूडकोर्टसाठीही निविदा काढली होती. परंतु त्‍यास प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर दोन्ही प्रकल्पांसाठी निविदा परत काढून भाडे थोडे कमी करण्‍यावर मंडळाच्या बैठकीत एकमत झाले. आता हे दोन्ही प्रकल्प लवकरात लवकर भाडेपट्टीवर देण्याची प्रक्रिया करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

व्‍यायामशाळा पुन्‍हा सुरू करा

शिवाजी चौक व आंबेडकर चौकाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. तसेच बाजारातील पेट्रोलपंपाजवळील चौकात भाऊसाहेब बांदोडकर यांचा पुतळा स्थापन करून त्या मार्गाला त्यांचे नाव देण्‍यात यावे. त्याचप्रमाणे पालिकेची विनावापर पडून असलेली व्‍यायामशाळा पुन्‍हा सुरू केल्यास महसूल मिळू शकतो. कुडचडे बाजारात ज्‍येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जागा नाही. त्‍याबाबतही विचार झाला पाहिजे, असे नगरसेवक बाळकृष्ण होडारकर यांनी यावेळी सूचना करताना सांगितले.

Goa Food Court
Bicholim Raksha Bandhan: बाजारपेठा सजल्‍या, मात्र राख्‍यांच्‍या विक्रीत घट!

...म्‍हणून ओढवली ही स्‍थिती

कुडचडे पालिका मंडळाच्या बैठकीत यापूर्वी अनेक ठराव घेण्यात आले, पण त्यांची पूर्तता कधीच झाली नाही. हे ठराव फक्त कागदावरच राहिले. पण आता घेतलेल्या ठरावांची पूर्तता होण्‍याची चिन्‍हे दिसू लागली आहेत. कुडचडे पालिकेची भव्य प्रशासकीय इमारत योग्य नियोजन न करता बांधल्याने आज त्‍यातील दहा दुकाने, दोन थिएटर्स व दोन रेस्‍टॉरंट्‌स महिन्याकाठी फक्त दीड लाख रुपये भाडेपट्टीवर देण्याची वेळ पालिकेवर आली आहे. तीच स्थिती फूडकोर्टची झाली असल्‍याचे होडारकर यांनी सांगितले.

कुडचडे पालिकेला दुकान भाडे तसेच कर, कचरा टॅक्स, व्यापार परवाना व घरपट्टी याद्वारे कोट्यवधी रुपये येणे बाकी आहेत. ते वसूल करण्‍यासाठी खास मोहीम राबविण्यात येणार आहे. काडा इमारत जलस्रोत खात्याने पालिकेकडे सुपूर्द करून चार वर्षे उलटली. तेथील दुकानदारांकडून किमान २५ लाख रुपये येणे बाकी आहेत. या रकमेच्‍या वसुलीवरही बैठकीत चर्चा झाली.

- प्रदीप नाईक, कुडचडे नगराध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com