Goa Loksabha Election Result: कळंगुटमध्ये तिसऱ्यांदा कोमेजले कमळ; बार्देशमधील पाच मतदारसंघांनी तारले!

Shripad Naik: बार्देशातील एकूण सात मतदार संघांपैकी कळंगुटमधून सलग तिसऱ्यांदा भाजपला लोकसभेत आघाडी मिळाली नाही. काँग्रेसला कळंगुटमधून २,१५७ इतके मताधिक्य मिळाले.
BJP's candidate from North Goa Shripad Naik won, but for the third time in a row BJP did not get the lead from Calangute
BJP's candidate from North Goa Shripad Naik won, but for the third time in a row BJP did not get the lead from CalanguteDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Loksabha Election Result: उत्तर गोवा मतदारसंघात श्रीपाद नाईक यांनी विजयाचा षटकार खेचला. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. रमाकांत खलपांचा दारूण पराभव केला. विशेष म्हणजे, बार्देशातील एकूण सात मतदार संघांपैकी कळंगुटमधून सलग तिसऱ्यांदा भाजपला लोकसभेत आघाडी मिळाली नाही. काँग्रेसला कळंगुटमधून २,१५७ इतके मताधिक्य मिळाले.

यंदाच्या लोकसभेत भाजपने म्हापसा अर्बन बँकपासून अयोध्येतील श्रीराम मंदिर तसेच ३७० कलम हटविण्याचा मुद्दा लावून धरला. तो पक्षाच्या विजयात निर्णायक ठरला. जरी भाऊंच्या विरोधात किंचित अँटी-इंकम्बंसीचे वातावरण निर्मिती झाले; परंतु काँग्रेसला त्याला राजकीय फायदा करून घेतला आला नाही. बार्देशातून भाजपला २०,६८० मतांची आघाडी मिळाली. तालुक्यातून भाजपला ७५,८७५ मते तर काँग्रेसला ५७,१९५ मते मिळाली.

BJP's candidate from North Goa Shripad Naik won, but for the third time in a row BJP did not get the lead from Calangute
Goa Loksabha Election Result: 'दक्षिणेत धर्माच्या आधारावर मतदान, पहिल्यांदाच आम्ही 2 लाखांहून अधिक मते मिळवली'- भाजप प्रदेशाध्यक्ष

हळदोणामधून भाजपला ९५५२ तर काँग्रेसला ९६३२ मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसच्या आघाडीचा फरक केवळ ८० मतांचा राहिला. गेल्यावेळी हळदोण्यातून भाजपला ५३७ मतांची आघाडी मिळाली होती. मात्र, ही आघाडी राखण्यात भाजपला अपयश आले. म्हापशात भाजपला १२३३० मते मिळाली, तर काँग्रेसला ८१७० मते. येथे भाऊंना ४१६० मतांची आघाडी प्राप्त झाली.

साळगावमधून भाजपला १११६२ तर काँग्रेसला ७६६७ मते मिळाली. याठिकाणी भाऊंना ३४९५ मतांची आघाडी मिळाली. शिवोलीतून भाजपला २६३१ मतांची आघाडी मिळाली. भाऊंना १०९२७ मते तर खलपांना ८२९६ मते मिळाली. थिवीतून भाजपला ४९२६ मतांची आघाडी मिळाली. यात भाऊंना ११,७९९ तर खलपांना ६८७३ मते मिळाली.

BJP's candidate from North Goa Shripad Naik won, but for the third time in a row BJP did not get the lead from Calangute
Goa Loksabha Election Result: उत्तरेत नाईकांचा विजयी षटकार; कॅप्टनकडून धेंपेंना ‘सायलेंट’ धक्‍का

काँग्रेसकडे कार्यकर्त्यांचा अभाव...

गत विधानसभा निकालानंतर काँग्रेसने बार्देशात पक्ष संघटनेकडे अपेक्षित लक्ष दिले नाही. परिणामी नेतृत्व व कार्यकर्त्यांचा अभाव लोकसभा प्रचारावेळी काँग्रेसला भोवला. दुसरीकडे भाजपचे संघटित नियोजनबद्ध काम तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्यासारखे पक्षाचे बडे नेते प्रचारासाठी उत्तरेत येऊन गेले.

काँग्रेसवाले विस्कटलेली संघटनात्मक घडी नीट करण्यात व्यस्त राहिले. पक्षाकडे उमेदवार ॲड. रमाकांत खलप, हळदोणेचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर व हातावर मोजण्याइतके कार्यकर्ते सोडले तर प्रत्यक्ष मैदानात कार्यकर्त्यांचा अभाव दिसला.

पक्षातील काही नेतेमंडळींनी पक्षाच्या उमेदवारासाठी अपेक्षित असे कामच केले नाही. किंबहुना पक्षविरोधी प्रचार केला, असे एकंदरीत तालुक्यातील आघाडी व मतांच्या गोळाबेरजेवरून दिसते. काँग्रेसने पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा स्वगृही आणण्यासाठी राजकीय हालचाली किंवा समीकरणे राबविली नाही. एकूणच दिशाहीन नेतृत्व व असंघटितपणामुळे पक्षाला बार्देशातून अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

BJP's candidate from North Goa Shripad Naik won, but for the third time in a row BJP did not get the lead from Calangute
Goa Loksabha Election Result: मयेवासीयांची श्रीपाद नाईकांना ‘विक्रमी’ साथ; विरोधकांचा स्वप्नभंग !

खंवटेंनी दाखवली ‘पॉवर’

पर्वरीतून भाजपला सर्वाधिक ५७०५ मतांची आघाडी मिळाली. भाऊंना १२,६२३ मते तर काँग्रेसच्या खलपांना ६,९१८ मते मिळाली. त्यामुळे मंत्री रोहन खंवटे यांनी बार्देशातील आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली.

लोबो मॅजिक फॅक्टर चाललाच नाही

विधानसभेतून कळंगुट मतदारसंघाचे मागील तीन टर्म मायकल लोबो हे लोकप्रतिनिधित्व करताहेत. परंतु, लोकसभा निवडणुकीत लोबो मॅजिक फॅक्टर चालत नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. काँग्रेसला कळंगुटमधून २,१५७ मतांची आघाडी मिळाली. २०१९ मध्ये काँग्रेसची कळंगुटमधील आघाडी २,४५८ इतकी होती, जी काँग्रेसने पुन्हा शाबूत ठेवली. तसेच कळंगुटमधून भाजपची पीछेहाट लोबोंसाठी भविष्यात नकारात्मक ठरू शकते. कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा हे भाजपचे नेते; परंतु सिक्वेरांनी पक्षासाठी किती काम केले, हा संशोधनाचा विषय आहे.

BJP's candidate from North Goa Shripad Naik won, but for the third time in a row BJP did not get the lead from Calangute
Goa Loksabha Election 2024 Result: दुपारपर्यंत ठरणार गोव्याचे खासदार, दोघांनाही दोन्ही जागांबाबत विश्वास

कार्लुस फेरेरा ठरले अव्वल

कळंगुटवासीयांनी पुन्हा एकदा लोकसभेसाठी काँग्रेसच्या ‘हाता’ची साथ धरली. दुसऱ्या बाजूने हळदोणा मतदारसंघात काँग्रेसने ८० मतांच्या आघाडीने बाजी मारली. विद्यमान आमदार कार्लुस फेरेरा आणि माजी आमदार ग्लेन टिकलो यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईत फेरेरा हे अव्वल ठरले.

BJP's candidate from North Goa Shripad Naik won, but for the third time in a row BJP did not get the lead from Calangute
Goa Loksabha Result: पाच पांडव, मनी पॉवर, मोदींचा नैतिक पराभव; भाजप- काँग्रेसला गोव्यात 1-1 जागा, विजयानंतर कोण काय म्हणाले?

थिवी, शिवोलीत ‘आरजी’ला आघाडी

मतांची आघाडी पाहता, बार्देश तालुक्याने पुन्हा एकदा भाजपसोबत राहणे पसंत केले. विशेष म्हणजे, ‘आरजी’ला थिवी मतदारसंघातून ३२६१ मते मिळाली. तर शिवोलीतून ३५८५ मते मिळाली, तर ‘आरजी’ला सर्वाधिक कमी मते पर्वरीतून (८३४) प्राप्त झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com