Goa Loksabha Result: पाच पांडव, मनी पॉवर, मोदींचा नैतिक पराभव; भाजप- काँग्रेसला गोव्यात 1-1 जागा, विजयानंतर कोण काय म्हणाले?

Loksabha Election 2024 Result: यंदाची लोकसभा निवडणूक अभूतपूर्व ठरली. राज्यातील दोन्ही जागा पुन्हा एकदा स्वबळावर जिंकण्याचा मानस भाजपने व्यक्त केला होता.
BJP Shripad Naik won by 1 lakh in north and viriato of congress by 14k south goa leaders reactions
BJP Shripad Naik won by 1 lakh in north and viriato of congress by 14k south goa leaders reactionsDainik Gomantak

Goa Loksabha Election Result 2024: यंदाची लोकसभा निवडणूक अभूतपूर्व ठरली. राज्यातील दोन्ही जागा पुन्हा एकदा स्वबळावर जिंकण्याचा मानस भाजपने व्यक्त केला होता. उत्तर गोव्यातून जेष्ठ नेते श्रीपाद नाईक तर दक्षिण गोव्यातून पल्लवी धेंपे यांना भाजपने रिंगणात उतरवले होते. तर काँग्रेसने उत्तर गोव्यातून रमाकांत खलप आणि दक्षिण गोव्यातून विरियातो फर्नांडिस यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते.

भाजप आणि काँग्रेस यांच्यात घमासान

काँग्रेसने खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्याऐवजी कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना उमेदवारी दिली. विरियातो यांच्या उमेदवारीचे इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी देखील स्वागत केले. दोन्ही जागांसाठी भाजप आणि काँग्रेसने आपली संपूर्ण ताकद लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या दोन्ही उमेदवारांसाठी प्रचारसभा घेऊन गोव्यातील मतदारांना पुन्हा एकदा भाजपला विजयी करण्याची साद घातली होती. तर काँग्रेसनेही आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बड्या नेत्यांना मैदानात उतरवले होते. प्रचारादरम्यान दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या.

BJP Shripad Naik won by 1 lakh in north and viriato of congress by 14k south goa leaders reactions
Goa Loksabha Election 2024 Result: दुपारपर्यंत ठरणार गोव्याचे खासदार, दोघांनाही दोन्ही जागांबाबत विश्वास

भाजप आणि काँग्रेसचे पारंपारिक बालेकिल्ले

उत्तर गोवा मतदारसंघ हा पारंपारिकपणे भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. तर दक्षिण गोवा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. यंदाही भाजपने आपला बालेकिल्ला राखला. तर दुसरीकडे, काँग्रेसनेही 2019 मधील पराभवाचा वचपा काढत बालेकिल्ला राखला.

उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक विजयी

उत्तर गोव्यातून विद्यमान खासदार श्रीपाद नाईक तब्बल 1.13 लाख मतांनी विजयी झाले. त्यांना एकूण 2,53,812 मते मिळाली. तर, काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांना 1,40,191 एवढी मते मिळाली. रमाकांत खलप यांनी उत्तर गोव्यातील आपला पराभव मान्य केला.

पराभवानंतर खलपांची प्रतिक्रिया

पराभवानंतर खलप म्हणाले की, जनतेने दिलेला निर्णय मला मान्य आहे. लोकसेवेसाठी कायम तत्पर राहणार असल्याचे खलप म्हणाले.

दक्षिण गोव्यात विरियातो फर्नांडिस विजयी

दरम्यान, 2019 मध्ये काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दक्षिण गोव्यात भाजपने दणदणीत विजय मिळवला होता. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आपला बालेकिल्ला राखण्यात यश आले. दक्षिण गोव्यातील काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी भाजपच्या पल्लवी धेंपे यांचा दारुण पराभव केला. फर्नांडिस यांचा 14,216 मतांनी विजय झाला. त्यांना 2,16,022 एवढी मते मिळाली. त्यांच्या विरोधात असलेल्या पल्लवी धेंपे यांना 2,01,806 एवढी मते मिळाली.

‘मोदींचा हा नैतिक पराभव’

विजयानंतर विरियातो म्हणाले की, ‘आज पाच पांडवांनी कौरवांचा पराभव केला, आजचा विजय मनी पॉवर विरोधात पीपल पॉवरचा आहे. मोदींचा हा नैतिक पराभव आहे.’

BJP Shripad Naik won by 1 lakh in north and viriato of congress by 14k south goa leaders reactions
Goa Loksabha Election 2024 Result Update: गोव्यातील पहिल्या फेरीचे कल हाती; दक्षिणेत भाजपला झटका तर उत्तरेत दिलासा

‘विरियातो संसदेत गोव्याचा आवाज बनतील’

विरियातो यांच्या विजयावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी देखील प्रतिक्रिया दिला. आलेमाव म्हणाले की, विरियातो फर्नांडिस संसदेत गोव्याचा आवाज होतील.

विरियातो यांच्या विजयावर सरदेसाई म्हणाले...

भ्रष्ट सरकार आणि पक्षांतराच्या विरोधात हे मतदान झाल्याचे मत गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले.

BJP Shripad Naik won by 1 lakh in north and viriato of congress by 14k south goa leaders reactions
Goa Loksabha Result 2024: मतदान केंद्रावर थ्री टायर सुरक्षा, उत्सुकता शिगेला; सर्वांचे लक्ष निकालाकडे

भाजप आणि काँग्रेस यांच्यात निकराची लढाई

दरम्यान, उत्तर गोव्यात (North Goa) सत्ताधारी भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात निकाराची लढाई पाहायला मिळाली. नाईक आणि खलप यांच्यातील लढाई चांगलीच रंगली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. प्रचारादरम्यान नाईकांच्या कार्यकाळात उत्तर गोवा मतदारसंघात अनेक कामे झाली नाहीत, असा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला होता. तर भाजपने रमाकांत खलप यांचा म्हापसा अर्बन घोटाळा काढला होता. या घोटाळ्यावरुन भाजपने खलप यांना घेरले होते.

मात्र यंदा कॉंग्रेसला कसल्याही परिस्थिती नाईकांचा पराभव करायचा होता, परंतु त्यांना यश आले नाही. मात्र दक्षिण गोव्यात कॉंग्रेसला भाजपला पराभवाची धूळ चारता आली. राज्यातील दोन्ही जागांवर भाजप पुन्हा एकदा जिंकू शकतो, असे म्हटले जात होते. मात्र राज्यातील हुशार मतदारांनी उत्तर गोव्यात पुन्हा एकदा नाईकांचे हात बळकट केले. तर दक्षिण गोव्यात विरियातो यांचे हात बळकट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com