'गोव्यात भाजपच्या मिशन कमिशनचा सरकारी तिजोरीला 4 कोटींचा फटका'

काँग्रेसचा भाजपवर आरोप, सखोल चौकशीची मागणी
Amarnath Panjikar
Amarnath Panjikar Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजपच्या मिशन कमिशनमुळे राज्याच्या तिजोरीला सुमारे 4 कोटींचे नुकसान झाले आहे. विजेच्या खांबावरून नेण्यात येणाऱ्या टीव्ही व इंटरनेट केबल्सचा व्यवहार वीज खात्याकडून काढून घेऊन तो भाजपच्या महामंत्र्याच्या जवळच्या नातेवाईकाला दिल्याने हे नुकसान झाल्याचा दावा गोवा प्रदेश काँग्रेसच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

Amarnath Panjikar
पक्षांतर बंदी कायद्यातील त्रुटींवर तोडगा काढण्याची गरज; कायदे तज्ज्ञांचे मत

पणजीत काँग्रेस (Congress) कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रवक्ते तन्वीर खतीब, प्रदीप नाईक व हिमांशू तिवरेकर उपस्थित होते. पुढे बोलताना पणजीकर म्हणाले की, जाहिरात फलक व इंटरनेट तसेच स्थानिक टीव्ही चॅनेल केबल्ससाठी विजेचे खांब वापरण्यासाठी मंजूर केलेल्या निविदेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Amarnath Panjikar
Goa Assembly Election: गोव्यात त्रिशंकू विधानसभेचे संकेत

भाजपच्या (BJP) महामंत्र्यांच्या नातेवाईकांना मदत करण्याच्या उद्देशाने ही निविदा काढण्यात आली आहे. वीज खाते गेल्या सहा वर्षांपासून गोव्यातील विविध केबल नेटवर्क व इंटरनेट सेवा कंपन्यांकडून विविध उपविभागातर्फे भाडे घेत होते. त्यांच्या भांडवलदार मित्राला हा व्यवहार हाताळण्यास देऊ शकतील यामुळेच गेल्या एक वर्षापासून ते बंद करण्यात आले.

‘युक्रेनमधील गोमंतकीयांना परत आणा’

युक्रेनमध्ये वास्तव्यास असलेल्या राज्यातील लोकांना परत आणण्यासाठी सरकारने पावले उचलण्याची मागणी तन्वीर खतीब यांनी केली. रशियाने (Russia) युक्रेनवर हल्ला केला आहे. मात्र, गोमंतकीयांना परण्यासाठी सरकारने कोणतीच पावले न उचलल्याने त्यांनी खंत व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com