'भाजपने गंभीर आरोप असलेल्यांना उमेदवारी देऊन गोवेकरांचा अपमान केला आहे'

असा खळबळजनक आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.
Vijay Sardesai
Vijay Sardesai Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: पार्टी विथ डिफरन्स असे बिरूद लावून जनतेची सहानुभूती मिळविलेल्या भाजपाने गंभीर आरोप असलेल्यांना उमेदवारी देऊन समस्त गोवेकरांचा अपमान केल्याचा खळबळजनक आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला. (Goa Election Vijay Sardesai News)

Vijay Sardesai
Goa Congress: यावेळी काँग्रेसच सरकार स्थापन करणार; यात शंका नाही: सिक्वेरा

मुरगावमधील काँग्रेसचे (Congress) उमेदवार संकल्प आमोणकर यांच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई हेडलॅन्ड सडा येथे आले होते. तेंव्हा ते पत्रकारांशी बोलत होते.भाजपाने या निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा मनसोक्त वापर केलेला आहे.या पक्षाने जे उमेदवार रिंगणातउतरविले आहेत त्यात गंभीर आरोप असलेले उमेदवार आहेत. भ्रष्टाचार, बलात्कार, वासनाकांड, नोकरी घोटाळा, जमीन घोटाळा, अशा नानाविध आरोपात गुंतलेल्यांना उमेदवारी दिली आहे. भाजपा ही भ्रष्टाचारी जनता पार्टी बनलेली आहे असे सरदेसाई म्हणाले.

मुरगावचे भाजपाचे उमेदवार मिलिंद नाईक यांच्या वर वासनाकांडचा आरोप झाल्यावर त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले त्याच व्यक्तीला पक्षाने उमेदवारी बहाल केली. हा मुरगाव मधील जनतेचा आणि विशेषतः समस्त महिलांचा अपमान असल्याचे सरदेसाई म्हणाले. ह्याचाराग मतदारांनी निवडणुकीत (Election) काढून भाजपाला घरचा रस्ता दाखवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Vijay Sardesai
राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर

काँग्रेसचा उमेदवार संकल्प आमोणकर सर्व सामान्य जनतेत मिसळणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी ते झटणारे आहेत. ह्याचा अनुभव मुरगावतील जनतेने लॉकडाऊनच्या काळात घेतलेला आहे. संकल्प सारखे उमेदवार गोव्याच्या विधानसभेत निवडून आल्यास जनतेचे नक्कीच भले होईल. राजकारणाला नवीन दिशा प्राप्त होईल असे सरदेसाई यांनी सांगून यावेळेस संकल्प आमोणकर यांचा विजय नक्की होईल असा विश्वास व्यक्त केला.

काॅग्रेस पक्षाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्रीनिवास, गोवा प्रदेश युवा अध्यक्ष वरद म्हादोळकर यांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा पर्यंत मुरगावचे काँग्रेस उमेदवार संकल्प आमोणकर यांचा घरोघरी जाऊन प्रचार केला. मुरगावकरांच्या उज्वल भविष्यासाठी आणि महिलांचा मान सन्मान राखण्यासाठी आमोणकर यांनाच भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन यावेळी उभय नेत्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेताना केले.

राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्रीनिवास यांना देशभर 'ऑक्सिजन मॅन' म्हणून ओळखले जातात. कोविडच्या काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना मृत्यूला कवटाळावे लागले तेंव्हा श्रीनिवास यांनी देवदूत बनून ऑक्सिजनची व्यवस्था करून लोकांचे प्राण वाचविले होते. तेच ऑक्सिजन मॅन सडा परीसरात येऊन त्यांनी संकल्पचा प्रचार केला.

Vijay Sardesai
Goa Election: ...तर आम्ही उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देऊ: TMC

मुरगावमध्ये भाजपाने (BJP) वासनाकांडचा आरोप असलेल्या मिलिंद नाईक यांना उमेदवारी दिली आहे, यावरून भाजप कोणत्या थराला पोचला आहे याचा अंदाज येतो. मुरगावमधील जनतेने या सर्व गोष्टींचा विचार करून मतदान करावे असे आवाहन श्रीनिवास यांनी केले. जनतेच्या उत्कर्षासाठी झटणारे संकल्प आमोणकर यांना निवडून आणण्याचा निर्णय जनतेने आणि विशेषतः महिला वर्गाने घ्यावा असे श्रीनिवास यांनी सांगून भाजपाच्या बी टिम असलेल्या तृणमूलआणि आप या पक्षाना गोव्यात थारा देऊ नका अशी सूचना त्यांनी केली. या दोन्ही पक्षाना भाजपानेच गोव्यात आणले असून फक्त त्यांना काँग्रेसची मते विभागलेली पाहिजे असे श्रीनिवास म्हणाले.

यावेळी प्रदेश युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी यावेळी संकल्प आमोणकर भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. घरोघरी प्रचार करतेवेळी मतदारांच्या मुखातून यावेळेस नक्कीच बदल होऊन संकल्पचा विजय होईल असे उद्गार ऐकायला मिळाले असे म्हार्दोळकर म्हणाले. मुरगावतील जनतेने मला एकदा संधी देऊन माझ्यातील जनतेप्रती असलेली भावना जाणून घ्यावी असे आवाहन उमेदवार संकल्प आमोणकर यांनी मतदारांना केले. या प्रचार दौऱ्यावेळी युवा कार्यकर्त्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दाखविला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com