Goa Congress: यावेळी काँग्रेसच सरकार स्थापन करणार; यात शंका नाही: सिक्वेरा

आता आम्ही पहिल्यासारखेच कॉंग्रेसला बळकटी देणार आहोत; आलेक्स सिक्वेरा यांचे वक्तव्य
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील प्रत्येक पक्ष सर्वश्रेष्ठ बनण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न करत आहे. राजकीय पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत. आणि घरोघरी प्रचारही सुरू झाले आहेत. गोव्याच्या राजकारणात पक्षांतराने नवा इतिहास रचला आहे. आणि याचा सगळ्यात जास्त फटका कॉंग्रेस (Congress) पक्षाला बसला होता. पण आता ही चित्र बदलले असून, जसे नेते कॉंग्रेसमधून बाहेर पडले, तसेच अनेकांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेशही केला आहे.

Goa Congress
राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर

पुन्हा असे घडू नये यासाठी कॉंग्रेस पक्षाने बांबोळी मध्ये देवी महालक्ष्मी आणि हॉली क्रॉससमोर निवडणुकीनंतरही पक्षांतर न करण्याची शपथ घेतली. यावर अनेकांनी कॉंग्रेस पक्षावर टीका देखील केली. पण हळूहळू कॉंग्रेस पक्ष पूर्वीप्रमाणे मजबूत होण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसत आहे. यासंदर्भात कॉंग्रेसचे राज्य कार्यकारी अध्यक्ष आलेक्स सिक्वेरा (Alex Sequeira) यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाबद्दल येणाऱ्या निवडणुकीसाठी (Goa Assembly Elections 2022) अत्यंत विश्वास व्यक्त केला आहे.

Goa Congress
Goa Election: ...तर आम्ही उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देऊ: TMC

ते म्हणाले की, '2007 आणि 2012च्या निवडणुकीवेळी कॉंग्रेस गोव्यात सर्वात शक्तिशाली पक्ष होता. कारण त्यावेळी पक्षातील सर्व नेते, सदस्य आणि कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ होते. मात्र कालांतराने हे चित्र बदलले. 2017 पासून पक्षातील सदस्य पक्षांतर करू लागले. आणि यंदाच्या निवडणुकीदरम्यान तर याचे प्रमाण खूपच वाढले. पण आता आम्ही पहिल्यासारखेच कॉंग्रेसला बळकटी देणार आहोत. या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षच विजयी होऊन आपले सरकार स्थापन करणार आहे. कारण आता इथून पुढे कॉंग्रेसमध्ये पुन्हा पक्षांतर होणार नाही. त्यामुळे गोव्यात जनता आम्हालाच मत देणार आहे.'

सिक्वेरा यांनी पक्षाबद्दल दाखवलेल्या या विश्वासामुळे विरोधी पक्षांमध्ये काही हालचाली होणार का, किंवा यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस खरंच बाजी मारणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com