Goa Politics: 20 लाखांची लाच दिल्याचा आरोप खोटा, भाजप सरचिटणीस सिंग यांचे स्पष्टीकरण; माजी मंत्री मडकईकरांची पक्षातून हकालपट्टी होणार?

Goa Corruption Case: एका फाईलसाठी एका मंत्र्याला १५ ते २० लाखांची लाच दिल्याचा आरोप पांडुरंग मडकईकरांनी केला होता.
arun singh on goa corruption
arun singhDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: माजी मंत्री पांडुरंग मडकईकरांनी गेल्या आठवड्यात गोवा सरकारवर केलेल्या आरोपाने खळबळ निर्माण केली. राज्य सरकारमधील एका मंत्र्यांने १५ ते २० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप मडकईकरांनी केल्याने भाजप सरकारची गोची झाली. आरोप गंभीर असल्याने या प्रकरणाची एसीबीने देखील दखल घेतली. दरम्यान, मडकईकरांनी केलेले आरोप खोटे असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी केला आहे.

अरुण सिंग पणजीत (१३ मार्च) घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे उपस्थित होते. गोव्यातील प्रमोद सावंत सरकार अतिशय प्रामाणिकपणे काम करत असल्याचे अरुण सिंग म्हणाले. मडकईकरांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटे असल्याचेही सिंग यावेळी म्हणाले. मडकईकर आरोप का करतायेत? हे देखील सर्वांना माहिती असल्याचे सिंग म्हणाले.

arun singh on goa corruption
Goa News: शाळेच्या शौचालयात बेशुद्धावस्थेत आढळला 10 वर्षीय विद्यार्थी, मेंदूत रक्तस्त्रावामुळे झाला मृत्यू

भाजपचे सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष गोव्यात आले असता त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्यासह विविध नेते आणि आमदारांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. यावेळी पांडुरंग मडकईकरांनी संतोष यांच्याशी भेटीनंतर गोवा सरकारमध्ये काहीच योग्य पद्धतीने सुरु नसल्याचा आरोप केला होता. राज्यात भ्रष्टाचार नव्हे तर लूट सुरु असल्याचा आरोप मडकईकरांनी केला होता. तसेच, एका फाईलसाठी एका मंत्र्याला १५ ते २० लाखांची लाच दिल्याचा आरोप त्यांनी केला होता.

arun singh on goa corruption
Shigmo Festival: ह्रदयद्रावक! शिगम्यात ताशा वाजवताना हार्ट अटॅकने एकाचा मृत्यू; केपे तालुक्यात पसरली शोककळा

मडकईकरांची पक्षातून हकालपट्टी होणार?

सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करणाऱ्या पांडुरंग मडकईकरांवर पक्ष कारवाई करणार का? याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर पक्षात याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती खासदार सिंग यांनी दिली आहे. पक्षाने कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यास मडकईकरांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, २०२७ च्या निवडणुकीसाठी मडकईकर इच्छुक असून, पक्षाने तिकिट नाकारल्यास इतर पक्ष संपर्कात असल्याची माहिती त्यांनी यापूर्वीच दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com