Shigmo Festival: ह्रदयद्रावक! शिगम्यात ताशा वाजवताना हार्ट अटॅकने एकाचा मृत्यू; केपे तालुक्यात पसरली शोककळा

Morpirla Shigmo Festival Tragedy: केपे तालुक्यातील मोरपिर्ला येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
Morpirla Shigmo Festival Tragedy
Morpirla Shigmo Festival TragedyDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Man Dies Of Heart Attack During Shigmo Celebration

केपे: गोव्यात सध्या शिगमोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. याचदरम्यान केपे तालुक्यातील मोरपिर्ला येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

नेमकं प्रकरण काय?

केपे तालुक्यातील मोरपिर्ला येथे बुधवारी (12 मार्च) संध्याकाळी वेळीपांच्या शिगम्याच्या मांडावर ताशा वाजवत असताना एका व्यक्तीला ह्रदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याने तो खाली कोसळला. तेव्हा तात्काळ उपस्थित लोकांनी त्याला रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली मात्र त्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. श्रीकांत गांवकर (वय, वर्ष 50) असे या ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Morpirla Shigmo Festival Tragedy
Shigmo Festival Goa : शिगमोत्सवाची पर्यावरणीय गीते; लोकोत्सव-पर्यावरणाची अनोखी सांगड

गांवकर वीज खात्याचे कर्मचारी होते

पीडित श्रीकांत गांवकर हे वीज खात्याचे कर्मचारी होते. मोरपिर्ला पंचायतीच्या पंचपदीही त्यांनी काम केले आहे. तसेच, त्यांनी एकता युवा संघाचे संयुक्त सचिव म्हणूनही कार्यरत होते. मागील दोन दोन दशकांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. मात्र अचानक झालेल्या त्यांच्या मृत्यूने केपे (Quepem) तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com